BJP Leader : भाजप नेत्याचे मनोहरमामाशी आर्थिक संबंध?; भिगवणजवळील शिक्षण संस्थेत सोमवारी रात्रीपासून पोलिसांकडून झाडाझडती, प्राध्यापक ताब्यात

Karmala News : भाजप नेत्याचे मनोहरमामा भोसले याच्याशी कथित आर्थिक संबंध असल्याच्या आरोपांनंतर सोलापूर पोलिसांनी भिगवणजवळील शिक्षण संस्थेत चौकशी सुरू केली आहे.
Education Campus near Bhigwan
Education Campus near BhigwanSarkarnama
Published on
Updated on

Karmala, 11 August : भारतीय जनता पक्षाचे करमाळा तालुक्यातील नेते तथा इंदापूर तालुक्यातील भिगवणजवळील शिक्षण संस्थेच्या प्रमुखाचे भोंदू मनोहरमामा भोसले याच्याशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भिगवणजवळील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील शिक्षण संस्थेत सोलापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सोमवारी (ता. १० ऑगस्ट) रात्रीपासून चौकशी आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. या चौकशीदरम्यान पोलिसांनी एका प्राध्यापकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे करमाळा तसेच भिगवण परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

सोलापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक सोमवारी रात्री भिगवणजवळील शिक्षण संस्थेच्या परिसरात दाखल झाले आहे. मंगळवारी सकाळपर्यंतही पोलिसांची संस्थेतील उपस्थिती कायम असल्याची माहिती आहे. त्यांनी संस्थेतील कार्यालयीन कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी, संगणकीय माहिती तसेच अन्य संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

या कारवाईदरम्यान संस्थेशी संबंधित एका प्राध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना नेमके कोणत्या कारणांसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कोणती माहिती घेण्यात आली किंवा त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

भाजप नेते तथा शिक्षण संस्था चालकांचे भोंदू मनोहर भोसले याच्याशी आर्थिक संबंध असल्याचे आरोप यापूर्वी झाले आहेत. या आरोपांच्या अनुषंगानेच पोलिसांकडून संस्थेतील आर्थिक व्यवहार व संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची चर्चा आहे. मात्र संस्था चालक आणि मनोहर भोसले यांच्यात प्रत्यक्ष कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले, त्याची रक्कम किती होती किंवा या व्यवहारात कोणाची भूमिका होती, याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नाही.

Education Campus near Bhigwan
Karad Politic's : माजी मंत्र्याच्या वाढदिवसाचे फ्लेक्स लावण्यासाठी कऱ्हाड नगरपालिकेने ठरावच बदलला...

तपासात काही महत्त्वाची कागदपत्रे किंवा धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. संबंधित संस्था चालकावरील आरोपांमध्ये नेमके किती तथ्य आहे. प्राध्यापकाची कोणत्या कारणासाठी चौकशी सुरू आहे, संस्थेतील कोणते आर्थिक व्यवहार पोलिसांच्या तपासाच्या कक्षेत आहेत आणि मनोहर भोसले प्रकरणाशी त्यांचा नेमका काय संबंध आहे, हे पोलिसांच्या अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Education Campus near Bhigwan
BJP Counter Attack : ज्योती वाघमारेंना खासदारकी मिळाल्याने सुषमा अंधारेंच्या डोक्यावर परिणाम झालाय : भाजपचा पलटवार

शैक्षणिक संस्थेत रात्रीपासून चौकशी सुरू असल्याने विद्यार्थी, पालक तसेच भिगवण परिसरातील नागरिकांचे या तपासाकडे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com