
उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी फोनवर धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
या प्रकरणानंतर महाराष्ट्रात त्यांच्यासाठी प्रचंड पाठिंबा उमटला.
करमाळ्यात अतुल खूपसे आणि शेतकरी संघटनेने दुग्धाभिषेक आंदोलन केले.
आंदोलनानंतर खूपसे व 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेमुळे अजित पवार विरुद्ध रोष वाढला असून राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे.
Solapur News : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूरमधील पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्यातील फोनवरचा संवाद सध्या राज्याच्या चर्चेचा विषय बनला आहे. सध्या यांच्यातील संवादाची व्हिडीओ क्लीप प्रचंड व्हायरल होत असून विरोधकांनी यावरून टीकेची झोड उठवली आहे. यादरम्यान जनशक्ती शेतकरी संघटनेनं या महिला अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ आनोखे आंदोलन केले. त्यांनी अंजना कृष्णा यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करत या घटनेचा निषेध केला. यानंतर आता पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. थेट 10 जनांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे सोलापुरात सध्या खळबळ उडाली आहे.
करमाळा पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा या धडाकेबाज कारवाईसाठी ओळखल्या जातात. यावेळीही त्यांनी बेकायदेशीर मुरूम उत्खनन प्रकरणात धडक कारवाई करण्यासाठी पावले उचलली. यावेळी त्यांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन झापले. तसेच तुझ्यावर कारवाई करेन अशी धमकी दिली. सध्या याच धमकीवरून राज्यात रान उठले असून या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच करमाळ्यातील कमलाभवानी मंदिरासमोर जनशक्ती शेतकरी संघटना अंजना कृष्णा समर्थनार्थ रस्त्यावर उतरली.
संघटनेचे नेते अतुल खूपसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या महिला अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ त्यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक केला. पण आता यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात अतुल खूपसे यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय झालं :
बेकायदेशीर मुरूम उत्खनन प्रकरणात धडक कारवाई करण्यासाठी DYSP अंजना कृष्णा गेल्या होत्या. त्यावेळी ग्रामस्थ आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. याचवेळी बाबा संरपच बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून दिला. यावेळी त्यांनी कारवाई तात्काळ थांबवा असे आदेश दिले.
त्यावर अंजना कृष्णा यांनी तुम्हीच अजित पवार कसे? असे म्हणत माझ्या नंबरवर फोन करा असे उत्तर दिले. यावर भडकलेल्या अजित पवार यांनी "तुमची इतकी हिंमत की मला ओळखलं नाही?" अशा शब्दांत अंजना कृष्णा यांना झापले. तसेच "मी तुमच्यावर कारवाई करीन" असा इशारा दिला. याच संवादाचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यानंतर जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले होते.
प्र.१: अंजना कृष्णा प्रकरण काय आहे?
उ. बेकायदेशीर मुरूम उत्खनन प्रकरणात कारवाई करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
प्र.२: आंदोलन कोणी केलं?
उ. जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी करमाळ्यात आंदोलन केले.
प्र.३: आंदोलनाची पद्धत कशी होती?
उ. महिला अधिकाऱ्याच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
प्र.४: आंदोलनकर्त्यांवर काय कारवाई झाली?
उ. अतुल खूपसे आणि 10 कार्यकर्त्यांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्र.५: या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
उ. या घटनेमुळे महाराष्ट्रात राजकीय संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.