
Pune News : शिवसेना अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली होती. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर त्यांच्या या घोषणेवरून विरोधकांनी टीकेची झोड उठली होती. तर पुण्यातील एका मनसे कार्यकर्त्याने सोशल मीडियावर टीका करणारी पोस्ट करत एकनाथ शिंदेंसह शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. पण आता हे प्रकरण त्या मनसैनिकाच्या चांगलेच अंगलट आले असून त्याच्याविरोधात थेट गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राज्यातले राजकीय वातावरण पुन्हा तापणार असून मनसे-शिवसेना पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
‘जय गुजरात’ घोषणेविरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली असून शिंदेवर जोरदार टीका होत असतानाच सोशल मीडियावरही टीका होत होती. अशातच मनसे कार्यकर्ता रोहन पवार याने देखील एकनाथ शिंदेंचा (Eknath shinde) एक फोटो शेअर करत त्यावर “जय गुजरात” असं कॅप्शन टाकत शेअर केलं होतं. यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती.
तर मनसे कार्यकर्ता रोहन पवार याच्या पोस्टवर स्वप्निल एरंडे यांनी आक्षेप घेत बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी रोहन पवार याच्याविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर व सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यावरून गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण येण्याची शक्यता असून स्थानिक राजकीय वातावरणही तापले आहे.
दरम्यान या घोषणेवरून शिंदेंवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेना (ठाकरे) आणि मनसे यावरून शिंदेंना ‘गुजरातप्रेमी’ म्हणत महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केल्याचा दावा केला होता. याचपार्श्वभूमिवर रोहन पवार याने “जय गुजरात” असं कॅप्शन देवून पोस्ट व्हायरल केली होती. पण आता गुन्हा दाखल झाल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासह राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याची टीका विरोधकांनी सरकारवर केली आहे.
पुण्यातील जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन सोहळा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाला. यावेळी एकनाथ शिंदे तेथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाच्या शेवटी “जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात” अशी घोषणा दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.