Solapur Politics : सोलापुरात 55 वर्षांच्या इतिहासात दोन मोठ्या संस्थांत प्रथमच स्वतंत्र संचालक; गोरे अन्‌ भाजप अनोख्या विक्रमाच्या दिशेने...

Solapur DCC Bank & Cadre Election 2026 : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोलापूर डीसीसी आणि कॅडर संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून कॅडरची निवडणूक आधी होण्याची शक्यता आहे.
Solapur independent directors appointment
Solapur independent directors appointmentSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 August : उच्च न्यायालयाच्या आदेशाने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (डीसीसी) आणि सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या (कॅडर) निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

डीसीसीपूर्वी कॅडरची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. कॅडरचा मतदार आणि डीसीसीच्या सोसायटी मतदारसंघातील मतदार एकच असल्याने कॅडरची निवडणूक म्हणजे मिनी डीसीसीचीच निवडणूक मानली जाते.

सन १९७१ मध्ये स्थापन झालेल्या कॅडरवर २०१७ पर्यंत डीसीसीच्या संचालकांनीच पदसिद्ध संचालक म्हणून काम पाहिले. आता तब्बल ५५ वर्षांनंतर पहिल्यांदाच कॅडरसाठी आणि डीसीसीसाठी स्वतंत्र संचालक मंडळ असणार आहे.

कॅडरच्या स्वतंत्र संचालक मंडळाच्या माध्यमातून डीसीसीचे मिनी आणि भावी संचालकच जिल्ह्याच्या सहकारात तयार होणार आहेत. त्यामुळे डीसीसीएवढेच महत्त्व कॅडरच्या निवडणुकीलाही येणार आहे. जिल्ह्यात सध्या १,२९२ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत.

यातील पात्र सोसायट्यांमधून कॅडरसाठी १६ संचालक, तर डीसीसीसाठी ११ संचालक निवडले जाणार आहेत. या दोन्ही संस्थांचे संचालक मंडळ बरखास्त होईपर्यंत या बँकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व होते. या नेत्यांच्या सहकारातील सोयीसाठी भाजप म्हणून माजी आमदार (कै.) सिद्रामप्पा पाटील व शेकाप म्हणून माजी आमदार (कै.) गणपतराव देशमुख यांना ‘ॲडजेस्ट’ केले जात होते.

कॅडर आणि डीसीसी या दोन्ही सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील दोन ते चार महिन्यांत होण्याची शक्यता आहे. आता जिल्ह्याच्या राजकारणात भाजप पॉवरफुल झाला आहे. कधी नव्हे ते कॅडर आणि डीसीसीवर पूर्ण ताकदीने एन्ट्री करण्यासाठी भाजपला जिल्ह्याच्या सहकारात पोषक वातावरण तयार झाले आहे. या वातावरणात किती मूळ नेत्यांना आणि किती रेडिमेड आयात नेत्यांना सामावून घेतले जाणार, यावर कोअर भाजपचे भविष्य अवलंबून दिसते.

Solapur independent directors appointment
Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँक निवडणूक तापली : बाळासाहेब पाटील यांच्या प्रभावक्षेत्रात भाजप आमदार मनोज घोरपडेंची बाजी

पालकमंत्री विक्रमाच्या दिशेने

सोलापूरचे पालकमंत्री म्हणून आतापर्यंत अनेक नेत्यांनी काम केले. या सर्वांच्या तुलनेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पक्षीय कामगिरी सर्वांत उजवी राहिली आहे. जिल्ह्यातील ११ पैकी १० पंचायत समित्या, १२ पैकी ४ नगराध्यक्षपदे, जिल्हा परिषद व महापालिकेवर एकहाती वर्चस्व आणि विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची आमदारकी भाजपने जिंकली आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी कर्णधार म्हणून पालकमंत्री गोरे यांनी जबाबदारी पार पाडली.

येत्या काळात कॅडर, डीसीसी आणि सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणूक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यशानंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे यांची विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जिल्ह्याच्या राजकारणात पक्षाला मोठे यश मिळवून देण्याची नोंद पालकमंत्री गोरे यांच्या नावावर होण्याची शक्यता आहे.

Solapur independent directors appointment
Adinath Sugar Factory : 450 कोटींचा आदिनाथ अवघ्या 120 कोटींत कोणाला हवाय? : आमदार नारायण पाटलांचे ओंकार शुगरच्या बोत्रे पाटलांवर गंभीर आरोप

दूध संघाचाही लवकरच निवडणूक

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत मार्च २०२७ मध्ये संपत आहे. कॅडर आणि डीसीसीची निवडणूक झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच जिल्हा दूध संघाची निवडणूक होणार आहे. कॅडर, डीसीसी आणि जिल्हा दूध संघ या जिल्हास्तरावरील तीनही सहकारी संस्थांत भाजपची जोरदार एन्ट्री होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com