पाच कारखाने ब्लॅकलिस्टमध्ये; शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन

काही साखर कारखान्यांनी सुरुवातीला गाळप झालेल्या उसाचा ज्यादा दर दिला. परंतु नंतर गाळप झालेल्या उसाची बिले वेळेत दिली नाहीत.
sugarcane travelling
sugarcane travellingInternet
Published on
Updated on

कऱ्हाड : साखर आयुक्तांनी जाहीर केलेल्या ब्लॅक लिस्ट यादीत सातारा जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा समावेश आहे. त्या कारखान्यांना ऊस गाळपास देताना शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

sugarcane travelling
किरीट सोमय्यांचे आता मिशन जरंडेश्वर कारखाना..

श्री. मुल्ला म्हणाले, 2020-21 च्या गाळप हंगाममध्ये ज्या कारखान्यांनी एफआरपी दिली किंवा दिली नाही अथवा एफआरपी देण्यास विलंब केला अशा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्याबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने आम्ही आभार मानतो. महाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांनी सुरुवातीला गाळप झालेल्या उसाचा ज्यादा दर दिला. परंतु नंतर गाळप झालेल्या उसाची बिले वेळेत दिली नाहीत.

काही कारखान्यांनी उसाची बिले बुडविली आहेत. त्यात दुर्देवाने काही खासदार, आमदारांच्या कारखान्यांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील त्यामध्ये किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, खंडाळा तालुका साखर कारखाना म्हावशी, गुरु कमोडिटी सर्व्हिसेस लिमिटेड चिमणगांव चालवणारे जरंडेश्वर शुगर, स्वराज इंडिया अग्रो लिमिटेड उपळवे, ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड गोपूज या पाच कारखान्यांचा समावेश आहे. त्या पाच साखर कारखान्यांचा साखर आयुक्तांनी ब्लॅक लिस्टमध्ये समावेश केला आहे. शेतकऱ्यांनी या कारखान्यांना आपला ऊस गाळपास देताना सावधानता बाळगावी, असे आवाहनही श्री. मुल्ला यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com