Karad Politic's : गोरेंच्या आक्रमक स्ट्रॅटेजीमुळे आमदार भोसले, घोरपडेंचे यश झोकाळले; झेडपीच्या सत्तापदांपासून कऱ्हाड वंचित

Satara Zilla Parishad Sabhapati Election 2026 : सातारा झेडपी सभापती निवडीत कऱ्हाडला संधी न मिळाल्याने नाराजी वाढली असून खटावने वर्चस्व गाजवले, जयकुमार गोरेंच्या रणनीतीपुढे भाजप नेत्यांना माघार घ्यावी लागली.
jaykumar gore-manoj ghorpade-Atul Bhosale
jaykumar gore-manoj ghorpade-Atul BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Karad, 07 April : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर झालेल्या सभापती निवडीत अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कऱ्हाड तालुक्याला संधी मिळाली नाही. कऱ्हाड तालुक्यातून भाजपचे एका अपक्षासह सर्वाधिक नऊ सदस्य निवडून आले आहेत. तरीही खटाव तालुक्याने तीन पदे पटकावत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या मार्गदर्शनाखाली आपले वर्चस्व सिद्ध केले.

सातारा, वाई, खंडाळा तालुक्यांनाही एक-एक सभापतिपद मिळाले आहे, कऱ्हाड (Karad) तालुक्यातील आमदार अतुल भोसले आणि मनोज घोरपडे यांच्यासह भाजप नेत्यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. गोरेंच्या आक्रमक रणनीतीपुढे अनेक भाजप नेत्यांना आपल्या इच्छेला मुरड घालत नमते घ्यावे लागल्याचे दिसून येते.

नाट्यमय घडामोडी होऊन सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेनेकडे बहुमत असूनही त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष करता आला नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन सदस्यांना अपहरणाच्या प्रकरणात अटक झाली. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांची तीसच बेरीज झाली, तर त्यात बाजी मारुन भाजपने ३३ सदस्यांचा पाठिंबा मिळवत अध्यक्ष, उपाध्यक्षपद खेचुन आणले. त्यामुळे बहुमत नसतानाही भाजपच वरचढ झाल्याचे दिसून आले.

झेडपी अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे या खटाव गटातून, तर लता कर्णे या बुध गटातून निवडून आल्या आहेत. तेजस्विनी कदम या पुसेसावळी गटातून निवडून आल्या आहेत. पुसेसावळी हा गट तालुकानिहाय विचार करता खटावचा भाग आहे. त्यामुळे खटावला तीन पदांची लॉटरी लागली आहे.

jaykumar gore-manoj ghorpade-Atul Bhosale
Anjangaon Statue Controversy : अंजनगाव पुतळा प्रकरणी लक्ष्मण हाकेंच्या अडचणी वाढल्या; हाकेंसह 60 ते 70 जणांविरोधात गुन्हा दाखल

उपाध्यक्ष राजू भोसले हे सातारा तालुक्यातील कारी गटातून निवडून आले आहेत. ऋतुजा शिंदे या वाई तालुक्यातील तर ऋषिकेश धायगुडे खंडाळा तालुक्यातून निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे खटाव, सातारा, वाई, खंडाळा तालुक्यांना संधी मिळाली आहे. त्यात कऱ्हाड-पाटण तालुके हे पहिल्यांदाच त्यापासून दूर राहिले आहेत.

कऱ्हाड तालुक्यातील भाजपचे रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नीने अपक्ष उभे राहून निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता. फलटण तालुक्यातील सदस्यांनीही अडचणीच्या काळात भाजपला साथ दिली. सैदापूर गटातील सागर शिवदास, पाटणचे राजेश पवार, धनंजय ताटे यांचीही नावे चर्चेत होती. मात्र ऐनवेळी ही नावे मागे पडली. त्यामुळे कऱ्हाड-पाटणची संधी हुकली आहे.

कऱ्हाडला दिग्गजांची परंपरा

सातारा जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्षपदाचा मान कऱ्हाडच्या आबासाहेब पार्लेकर यांना मिळाला होता. त्यांच्यानंतर चरेगावचे पतंगराव माने यांनी उपाध्यक्षपद पटाकवले होते. कऱ्हाडची ही परंपरा सभापतींच्या माध्यमातून कालेतील ज्येष्ठ नेते (कै) भीमरावदादा पाटील, कोपर्डे हवेलीतील बाळासाहेब चव्हाण, मसुरचे माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, नीलम पाटील-पार्लेकर, रेठऱ्याच्या श्रीमती साळुंखे यांनी सभापतीपदे पटकावुन चांगली कामे केली. त्यांची कामे आजही चर्चेत आहेत.

jaykumar gore-manoj ghorpade-Atul Bhosale
Baramati bypoll update : काँग्रेसने उमेदवार द्यायला नको होता! प्रफुल्ल पटेलांचा बारामतीतून थेट प्रहार; पोटनिवडणुकीबाबत केला मोठा दावा

सदस्यसंख्या

भाजप-८

राष्ट्रवादी-२

अपक्ष (भाजपसमर्थक) - १

काँग्रेस- १

एकूण - १२

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com