Prithviraj Chavan : वयाच्या 80 व्या वर्षी पृथ्वीराज चव्हाण अडचणीत? सनातन संस्थेने पाठवली तब्बल 10 कोटींची नोटीस

Prithviraj Chavan : 'भगवा नव्हे, तर 'सनातनी दहशतवाद' म्हणा,' असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. मुंबईमध्ये शिवसेनेने त्यांच्याविरोधात मोर्चाही काढला.
Former Maharashtra CM Prithviraj Chavan served ₹10 crore defamation notice by Sanatan Sanstha
Former Maharashtra CM Prithviraj Chavan served ₹10 crore defamation notice by Sanatan SansthaSarkarnama
Published on
Updated on

Prithviraj Chavan News : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर दिलेली एका प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. हिंदू द्वेषी वक्तव्य केल्याप्रकरणी सनातन संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी चव्हाण यांना 10 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. तसेच चव्हाण यांनी या वक्तव्याप्रकरणी बिनशर्त माफी मागावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी तब्बल 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला. यात विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. याच निकालावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी भगवा दहशतवाद हा शब्द जन्माला घातल्याचे आरोप केले. अशी कोणतीही संकल्पना अस्तित्वात नसल्याचे सांगितले.

यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी 'भगवा नव्हे, तर 'सनातनी दहशतवाद' म्हणा,' असे विधान केले. यावरुन त्यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. मुंबईत शिवसेनेनेही त्यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. आता हेच वक्तव्य हिंदू द्वेषी असल्याचे म्हणत सनातन संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांच्या वतीने चव्हाण यांना 10 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच त्यांनी 15 दिवसांच्या आत लेखी माफी मागावी. अशीही मागणी करण्यात आली आहे.

Former Maharashtra CM Prithviraj Chavan served ₹10 crore defamation notice by Sanatan Sanstha
Prithviraj Chavan: विजनवासात गेलेले पृथ्वीराज चव्हाण शिवसैनिकांमुळे पुन्हा चर्चेत; शिवसेनेचा मुंबईत आक्रमक मोर्चा

मूळ मुलाखतीइतक्याच प्रसिद्धीने माफीनामाही प्रसिद्ध करावा. भविष्यात कोणतीही बदनामी करणारी विधाने करू नयेत आणि कायदेशीर खर्च म्हणून 10 हजार रुपये द्यावेत, अशीही मागणी करण्यात या नोटिशीत केली आहे. तर चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सनातन संस्थेची प्रतिमा मलिन झाली. ही नोटीस मिळूनही उत्तर न दिल्यास फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करू, असा इशारा संस्थेचे मानद कायदेशीर सल्लागार तथा मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी वकील रामदास केसरकर यांनी दिला आहे.

Former Maharashtra CM Prithviraj Chavan served ₹10 crore defamation notice by Sanatan Sanstha
Prithviraj Chavan Controversial Statement : 'भगवा नव्हे सनातनी, हिंदुत्ववादी आंतकवाद...', पृथ्वीराज चव्हाण चिदंबरम, दिग्विजय सिंगाच्याही एक पाऊल पुढे

सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण आज म्हणत आहेत की, 'भगवा' हा महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा, छत्रपती शिवरायांचा, संत ज्ञानेश्वरांपासून सर्व संत आणि वारकऱ्यांचा आहे. त्यामुळे कोणीही 'भगवा दहशतवाद' असे म्हणू नये. पण जेव्हा मालेगाव प्रकरण झाले, त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी यथेच्छ 'भगवा दहशतवाद' म्हणत हिंदूंना लक्ष्य केले. तेव्हा चव्हाण यांना 'भगवा' छत्रपतींचा आहे, संतांचा आहे, हे लक्षात आले नाही का? इतकी वर्षे ते झोपले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com