Solapur Politic's : ‘डीसीसी’च्या निवडणुकीतून आऊट झालेल्या माजी संचालकांना ‘कॅडर’चेही दरवाजे बंद : बड्या नेत्यांना सहकारातून सक्तीची विश्रांती

Solapur CADRE Election : सोलापूर कॅडर निवडणुकीत कलम ८८ अंतर्गत कारवाई झालेल्या माजी संचालकांचे अर्ज अपात्र ठरले. छाननीत ११ जणांचे १५ अर्ज बाद झाले, तर ९१ जणांचे ९४ अर्ज पात्र ठरले.
Solapur CADRE Election
Solapur CADRE ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 20 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालकांवर सहकार कायदा कलम ८८ अन्वये केलेल्या कारवाईमुळे डीसीसीनंतर आता कॅडरच्याही (सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था) निवडणुकीत माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बड्या नेत्यांना सहकारी क्षेत्रातून सक्तीची विश्रांती घ्यावी लागली आहे. कॅडरसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जावर आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांच्यासमोर छाननी झाली. त्यामध्ये ११ जणांचे १५ अर्ज अपात्र झाले आहेत. छाननीनंतर आता ९१ जणांचे ९४ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत.

जिल्हा बँकेचे माजी संचालक जयवंतराव जगताप, संजयमामा शिंदे, दिलीप माने, बबनराव आवताडे व सुरेश हसापुरे यांनी कॅडरसाठीही अर्ज दाखल केला होता. त्यांचे अर्ज आजच्या (ता. २० नोव्हेंबर) छाननीत अपात्र ठरले आहेत.

माजी संचालक एस. एम. पाटील यांच्यावर जबाबदारी निश्‍चित झाली असून त्यांचे वारस सुरेश पाटील यांच्यावर वारसाने ही जबाबदारी आली आहे, त्यामुळे त्यांचाही उमेदवारी अर्ज आजच्या छाननीत अपात्र झाला आहे. या शिवाय महिला मतदारसंघातील भारती भोंग यांच्या उमेदवारी अर्जावरील सही माझी नसल्याचे प्रतिज्ञापत्रच आजच्या छाननीमध्ये त्यांनी दिल्याने भोंग यांचा अर्ज अपात्र झाला आहे.

Solapur CADRE Election
Sugarcane FRP : बबनदादा, राजन पाटील, प्रशांत परिचारक, अभिजीत पाटलांमुळे सोलापुरात ऊसदराची कोंडी : ‘स्वाभिमानी’च्या नेत्याचा घाणाघाती आरोप

अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातील उमेदवार नानासाहेब नाईकनवरे हे गटसचिव म्हणून कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांचा अर्ज अपात्र झाला आहे. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले काशीनाथ गौडगुंडे यांनी भटक्या जातीचा दाखला अर्जासोबत जोडल्याने त्यांचा अर्ज अपात्र झाला आहे.

दक्षिण सोलापूर सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केलेले नागप्पा बनसोडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केलेल्या व्यक्तीनेही ही सही आपली नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याने बनसोडे यांचाही अर्ज अपात्र झाला आहे.

Solapur CADRE Election
Satara Dcc Bank Chairman : भाजप पक्षांतर्गत कुरघोड्या कोणी केल्या?; शिवेंद्रराजेंच्या कबुलीने नव्या वादाला तोंड फुटलं

उत्तर सोलापूर सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले तुकाराम गुंड हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पगारी कर्मचारी असल्याने आणि देखरेख संस्थेत मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याने त्यांचा अर्ज अपात्र झाला आहे. डीसीसीच्या माजी संचालकांसाठी ॲड. उमेश मराठे यांनी युक्तीवाद केला. नागप्पा बनसोडे यांच्यासाठी ॲड. वैभव देशमुख यांनी युक्तीवाद केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.