Western Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रातील माजी मंत्री भाजपला 'जय श्रीराम' करणार?; सुप्रिया सुळेंची घेतली भेट

Laxman Dhoble meet Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून भाजमध्ये प्रवेश करेपर्यंत लक्ष्मण ढोबळे हे शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून परिचित होते.
Supriya Sule-Laxman Dhoble
Supriya Sule-Laxman DhobleSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 October : लोकसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्ह्यात धक्क्यावर धक्के बसत आहेत. लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांपासून गळतीला झालेली सुरुवात अजूनही थांबायला तयार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे हेही भाजपला ‘जय श्रीराम’ करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आजच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून भाजमध्ये प्रवेश करेपर्यंत लक्ष्मण ढोबळे हे शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून परिचित होते.

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते तथा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे त्यांच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. मात्र, लक्ष्मण ढोबळे हे खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार की भाजपवर दबाव तंत्र वापरत आहेत, याची चर्चाही होत आहे.

लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजीत ढोबळे हे मोहोळ मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP SP) उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. पण, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार, याची मोठी उत्सुकता सोलापूर जिल्ह्यात आहे.

Supriya Sule-Laxman Dhoble
Shahajibapu Patil : शहाजीबापूंचा भाजपवर पलटवार; ‘आम्ही आमदारकी पणाला लावत गुवाहाटीला गेलो; म्हणून’

दरम्यान, भारतीय जनता पक्षात गेली दहा वर्षांपासून कुचंबणा सुरू आहे. पक्षाच्या कार्यक्रमातून डावलले जाते. कार्यक्रमाचे निमंत्रणसुद्धा मिळत नाही, त्यामुळे पक्षात अवहेलना होत आहे. तसेच, लक्ष्मण ढेाबळे यांचे राजकीय कारकिर्द संपवण्यासाठी त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करण्यात येत आहेत, त्यामुळे ढोबळे यांनी भारतीय जतना पक्षाला सोडचिठ्ठी द्यावी, अशी मागणी ढोबळे यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या बहुजन रयत परिषदेकडून करण्यात आली आहे.

बहुजन रयत परिषदेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी मंगळवेढा येथे जाऊन ढोबळे यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपतून बाहेर पडावे, यासाठी त्यांच्यावर दबाव वाढवत आहेत. भाजपमध्ये मागील 10 वर्षांपासून डावललं जात आहे, असा आरोपही बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Supriya Sule-Laxman Dhoble
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपचे बडे नेते उतरणार विधानसभेच्या मैदानात

बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून येणारा दबाव आणि भाजपकडून होणारे दुर्लक्ष पाहून लक्ष्मण ढोबळे यांनी आज मुंंबईत जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. सुळे यांच्याशी त्यांनी चर्चा केली असून घरवापसीबाबतचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com