Karveer Constituency : करवीरमध्ये चंद्रदीप नरकेंची अडचण, जनसुराज्यच्या दाव्याने महायुतीत चुरस !

Assembly Election 2024 : व्हिजन चरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी यापूर्वीच आपण जनसुराज्य शक्ती कडून करवीर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
Chandradeep narke- Santaji Ghorpade
Chandradeep narke- Santaji GhorpadeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : आगामी विधानसभा निवडणूक भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढणार की स्वतंत्र करणार याबाबत अजूनही एक वाक्यता नाही. अशातच जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी जिल्ह्यातील दहापैकी चार जागांवर दावा केल्यानंतर आतापासूनच महायुतीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा-शाहूवाडी, हातकणंगले आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती हे पारंपरिक पद्धतीने या मतदारसंघात उमेदवार निवडणुकीला उभे करतात. यंदा करवीर मतदार संघावर नजर आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांची या दाव्याने अडचण झाली आहे.

जनसुराज्य शक्ती हा पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील पन्हाळा-शाहूवाडी आणि हातकणंगले या विधानसभा मतदार संघात आपले उमेदवार देत असतात. यंदा करवीर विधानसभा मतदारसंघावर ही त्यांचा दावा असल्याचे सांगितले जाते. दिवगंत आमदार पी.एन.पाटील यांच्यानंतर त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदिप नरके या दोन पारंपरिक विरोधी लढतीत तिसऱ्याची एंट्री झाली आहे.

व्हिजन चरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी यापूर्वीच आपण जनसुराज्य शक्ती कडून करवीर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. तशी तयारीही त्यांनी सुरुवातीपासून सुरू ठेवली आहे.

Chandradeep narke- Santaji Ghorpade
Gokul Dudh Sangh : गोकुळ मध्ये जनावरांच्या जीवाशी खेळ? निनावी पत्राने उडाली खळबळ !

संताजी घोरपडे यांनी कोरोना काळात कोविड सेंटर पासून आपल्या राजकीय कार्यकर्तेला सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी मतदारसंघात नागरिकांशी सततचा संपर्क ठेवला आहे. राम रथ, करवीर महोत्सव सारख्या विविध उपक्रमातून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवाय करवीरच्या उत्तर भागात जनसुराज्य शक्ती पक्षाचा वाढता प्रभाव आहे. एक नवीन चेहरा म्हणून करवीरकर यांच्याकडे पाहू शकतात. शिवाय जनसुराज्य शक्तीला मानणारे नागरिक यांच्यावरच यांचा निर्णायक कौल समजू शकतो.

Chandradeep narke- Santaji Ghorpade
Vinay Kore : विनय कोरे वाढवणार महायुतीची डोकेदुखी; एक दोन नव्हे एवढ्या जागांची मागणी

करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाची शक्ती महत्त्वाची आहे. ही शक्ती वरून दिसत नसली तर अंडरकरंट महत्त्वाचा आहे. ते या लोकसभा निवडणुकीत ही दिसून आले आहे. हाच ठाकरे गट शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या आड येऊ शकतो. शिवाय जनसुराज्य शक्ती पक्षाची मोठी अडचण नरके यांच्यासमोर उभी राहू शकते.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com