Nagpur Congress : पक्षासाठी वेळ नसेल तर राजीनामा द्या, काँग्रेस शहराध्यक्षांनी ठणकावले !

Assembly Election 2024 : कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीचे नियोजन व पूर्व तयारी यावर चर्चा करण्यात आली. तसेच शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
MLA Vikas Thackeray
MLA Vikas Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : ज्यांच्याकडे काँग्रेस पक्षासाठी वेळ नाही त्यांनी राजीनामा द्यावा.पदे अडवून ठेऊ नका. तसेही निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना हटवण्यात येणार असल्याचा इशारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तसेच काम न करणारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कडक शब्दात ठाकरे यांनी सुनावले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर नागपूर (Nagpur) शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणी बैठक आमदार निवास येथे घेण्यात आली.यावेळी शहराध्यक्ष ठाकरे यांनी कडक शब्दात हा इशारा दिल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे विकास ठाकरे दहा वर्षांपासून शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. मागील महापालिकेची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात लढण्यात आली होती.निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये मोठी दुफळी निर्माण झाली होती.

MLA Vikas Thackeray
Chandrapur Assembly Election : खासदार प्रतिभा धानोरकरांनी चंद्रपूरसाठी पुन्हा लावली ‘फिल्डिंग’; विधानसभेसाठी बडा मासा गळाला!

ठाकरे यांनाच महापालिकेत येण्यापासून रोखण्यात आले होते. ठाकरे यांचे कट्टर समर्थक व तत्कालीन सत्ता पक्षनेते संजय महाकाळकर यांचीच खुर्ची काँग्रेसच्या नगरसेवकांनी उलथावून लावली होती.अद्यापही अनेक कार्यकर्ते ठाकरे यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी करीत आहेत.

शहर काँग्रेसची बैठक आणि देवडिया काँग्रेस (Congress) भवनातही ते जात नाहीत. त्यांच्यावर केव्हा कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीचे नियोजन व पूर्व तयारी यावर चर्चा करण्यात आली.सोबतच शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

MLA Vikas Thackeray
Bachchu Kadu: मोठी बातमी: बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी...

जे कार्यकर्ते विधानसभा तसेच महानगरपालिकेची निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत त्यांनी बुथ, वॉर्ड, प्रभागनिहाय नवीन मतदार नोंदविण्याची जबाबदारी घ्यावी. ब्लॉक अध्यक्षांनी बुथनिहाय बैठकांचे नियोजन करावे. 10 बुथवर एका निरिक्षकाची नेमणूक करावी. त्यांच्या माध्यमातून सर्व नियोजन करावे, असेही निर्देश ठाकरे यांनी दिले.

बैठकीत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विशाल मुत्तेमवार, गिरीश पांडव, प्रधान महासचिव डॉ. गजराज हटेवार, प्रशांत धवड, पुरुषोत्तम हजारे, उमाकांत अग्निहोत्री, रमन पैगवार, तानाजी वनवे, नॅश अली यांच्यासह इतर उपस्थित होते. याच बैठकीत लोकसभा, विधानसभा,महानगर पालिकेच्या उमेदवारी शुल्कातून 25 टक्के रक्कम शहर काँग्रेसला प्रदेश काँग्रेस कमिटीने द्यावी, अशी विनंती करण्यात आली.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com