Kolhapur Politics : "उमेदवार मी अन् विजयही माझाच..."; के.पी पाटलांना विश्वास, पण..

Radhanagari Assembly constituency : राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण? यावरून महायुती सोडून गेलेल्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. महायुतीचे संभाव्य उमेदवार आमदार प्रकाश अबिटकर यांच्या विरोधात माजी आमदार के.पी पाटील, ए.वाय पाटील, आणि राहुल देसाई यांनी शड्डू ठोकला आहे.
K.P. Patil
K.P. PatilSarkarnam
Published on
Updated on

Kolhapur News, 19 Sep : राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण? यावरून महायुती सोडून गेलेल्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. महायुतीचे संभाव्य उमेदवार आमदार प्रकाश अबिटकर यांच्या विरोधात माजी आमदार के.पी पाटील, ए.वाय पाटील, आणि राहुल देसाई यांनी शड्डू ठोकला आहे.

आबिटकर यांच्या विरोधात शक्तिशाली उमेदवार म्हणून के.पी पाटील (K.P Patil) यांना ओळखले जाते. मात्र, सततच्या बदलत्या भूमिकेमुळे पाटील यांच्या समर्थकांत नाराजी निर्माण झाली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना ऊर्जित अवस्था आणण्यासाठी नुकताच माजी आमदार पाटील यांच्या गटाचा मेळावा पार पडला.

या मेळाव्यात के.पी पाटील यांनी पुन्हा एकदा छाती ठोकून मीच उमेदवार असेल आणि मीच विजयी होईल असे जाहीर केले आहे. मेळाव्यात बोलताना के.पी पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्यावर निशाणा साधला. खोक्यासाठी गद्दारी स्वीकारलेल्या नेत्यांचा पराभव करण्यासाठी मलाच उमेदवारी मिळणार आहे. विजयी देखील मीच होणार आहे. अशी घोषणा माजी आमदार त्यांनी राधानगरी आमजाई व्हरवडे येथे झालेल्या मेळाव्यात केली.

मागील दहा वर्षे मतदार संघातील विकास पाहिला तर तो फक्त कमिशनवरच आहे. आमच्या काळात मिळणारा विकास कामाचा निधी आम्ही त्याच कामावर शंभर टक्के वापरत होतो. मात्र सध्याचे आमदार कमिशन घेतल्याशिवाय कामं करतच नाही. असा आरोप पाटलांनी केला.

K.P. Patil
BJP Politics Video : मोठी बातमी! भाजप 160 जागा लढणार, एकनाथ शिंदे, अजित पवारांचे काय?

मतदारसंघातील कामे ही कमिशनवरच होत असल्याने यंदा मी निवडणूक लढवणार आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक जिंकणार आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्वच पक्षांना मी सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहे. मला उमेदवारी मिळणार असून मी निवडूनही येणार आहे. उमेदवारी निश्‍चित झाल्यावर पुन्हा तुमचा आशिर्वाद घ्यायला मी तुमच्या गावात येणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

K.P. Patil
Sharad Pawar VS BJP : पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचा भाजपला दे धक्का; विद्यमान आमदार तुतारी फुंकणार ?

पाटील यांच्या या घोषणेनंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. याच मतदारसंघातून आघाडीकडून मलाच उमेदवारी मिळेल असा दावा यापूर्वी ए.वाय पाटील यांनी केला आहे. तर आता के.पी पाटलांच्या दाव्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु असल्याचं समोर आलं आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्यास अंतर्गत वाद पुन्हा एकदा राधानगरी मतदारसंघातून उफाळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com