Sharad Pawar VS BJP : पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचा भाजपला दे धक्का; विद्यमान आमदार तुतारी फुंकणार ?

Chinchwad BJP Mla Ashwini Jagtap News : चिंचवडच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप कमळाला सोडचिठ्ठी देत लवकरच तुतारी फुंकण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती समोर येत आहे.भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ आणि शहराध्यक्ष शंकर जगतापांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू आहेत.
Sharad Pawar | Devendra Fadnavis
Sharad Pawar | Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसं तसं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आपला एक एक पत्ते ओपन करू लागले आहे. आणि त्यांचं मुख्य टार्गेट भाजप आणि अजित पवार गटच असल्याचेही आता दिसून येत आहे. पुणे, पिंपरी चिंचवडसह ज्या ज्या ठिकाणी भाजप आणि अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांविरोधातच पवारांनी आपली मोहीम उघडली आहेत.

त्यातच अजित पवार आणि भाजपचा (BJP) दबदबा असलेल्या पुणे, पिंपरी चिंचवडमध्येच शरद पवारांनी धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान, आता पिंपरी चिंचवडच्या राजकारणात लवकरच आणखी एक मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या लवकरच भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा पिंपरी चिंचवडच्या राजकारणात जोर धरू लागली आहे.त्यांनी दीड महिन्यांपूर्वीच शरद पवारांसोबत संपर्क साधल्याचे बोलले जात आहे.

जगतापांनी जर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खरंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला तर हा भाजपसाठी मोठा धक्का असणार आहे. शरद पवारांची ही मास्टर खेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसह अजित पवारांसाठीही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.अश्विनी जगताप या सध्या भाजपात सक्रिय नसल्याची आणि माध्यमांना टाळत असल्याची चर्चा आहे.

Sharad Pawar | Devendra Fadnavis
Ladki Bahin Yojana : "विधानसभा निवडणुकीवर लाडकी बहीण योजनेचा परिणाम होणार नाही, पण पैशांचा..."; शरद पवार स्पष्टचं बोलले

चिंचवडच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप कमळाला सोडचिठ्ठी देत लवकरच तुतारी फुंकण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती समोर येत आहे.भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ आणि शहराध्यक्ष शंकर जगतापांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू आहेत.

भाजप नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीवेळीच शंकर जगतापांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्नही केले होते.तसेच अश्विनी जगतापांना त्यावेळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शंकर जगताप काही तासांसाठी नॉट रिचेबलही झाले होते.त्यामुळे त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा झाली होती.

पण आता शंकर जगतापांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे.तसेच उमेदवारीसाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे फिल्डिंग लावल्याचीही कुणकुण आहे.याचमुळे अश्विनी जगताप शरदचंद्र पवार पक्षाचा पर्याय स्विकारू शकतात असं पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Sharad Pawar | Devendra Fadnavis
Shivsena UBT Vs BJP : 'मोदींनी 10 वर्षांत पेरलेलं विष उगवलं...' राहुल गांधींवरील टीकेचा 'सामना'मधून समाचार

राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल काटे यांचा पराभव करत अश्विनी जगतापांनी चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकली होती. पण त्यावेळी अश्विनी जगतापांच्या उमेदवारीवरुन नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा होती. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा चिंचवडच्या उमेदवारीवरुन वातावरण तापण्याची शक्यता आहे.भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदाची धुरा सध्या शंकर पांडुरंग जगताप यांच्या खांद्यावर आहे.त्यांनी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

मात्र, त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. ते पोटनिवडणुकीतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते.

Sharad Pawar | Devendra Fadnavis
Ajit Pawar Video : आमदार गैरहजर, 80 जागांची मागणी; अजितदादांच्या बैठकीची इनसाईड स्टोरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com