Rajendra Raut : माजी आमदार राजेंद्र राऊत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार; माजी केंद्रीय मंत्र्याचे सूचक विधान

Raosaheb Danve Barshi Tour : राऊत यांना विधान परिषदेवर घेण्याची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत हे भाजपमध्ये जाणार का, अशी चर्चा रंगली आहे. कारण त्यांनी भाजप सदस्य नोंदणी मोहिम मोठ्या ताकदीने राबवली आहे. पक्षात नसूनही त्यांनी तब्बल 51 हजार सभासद केले आहेत, त्यामुळे राऊतांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.
Rajendra Raut-Raosaheb Danve
Rajendra Raut-Raosaheb Danvesarkarnama
Published on
Updated on

Solapur, 31 January : राजकारणात हार-जीत ही होतच असते. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासाखा कार्यकर्ता एका पराभवाने खचून जाणारा नाही. विधानसभेला पराभूत झाल्यानंतरसुद्धा राऊत यांनी बार्शी मतदारसंघातून भाजप सदस्य नोंदणी मोहिमेत ५१ हजार सभासद केले आहेत, ही छोटी गोष्ट नाही. राऊतांना राजकारणात चांगलं भविष्य आहे आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या या कामाची जरूर दखल घेईल, असे विधान माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बार्शीत केले.

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे आज बार्शीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे आले होते. राऊत यांच्या भेटीनंतर माध्यमाशी बोलताना दानवे यांनी राऊत यांच्याबाबत हे विधान केले आहे. राऊत यांनी विधानसभेला शिवसेनेत प्रवेश करून बार्शीतून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांना अपयश आले होते, त्यामुळे ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असे सांगितले जात आहे.

राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांना विधान परिषदेवर घेण्याची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत हे भाजपमध्ये जाणार का, अशी चर्चा रंगली आहे. कारण त्यांनी भाजप सदस्य नोंदणी मोहिम मोठ्या ताकदीने राबवली आहे. पक्षात नसूनही त्यांनी तब्बल ५१ हजार सभासद केले आहेत, त्यामुळे राऊतांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले, आम्ही अनेक निवडणुका हरलो आणि अनेक निवडणुका जिंकलो. फक्त नेत्यामधील कार्यकर्ता कधी मेला नाही पाहिजे. राजेंद्र राऊत यांच्यासाखा कार्यकर्ता एका पराभवाने खचून जाणारा नाही. विधानसभेला पराभूत झाल्यानंतरसुद्धा राजेंद्र राऊत यांनी बार्शी मतदारसंघातून भाजप सदस्य नोंदणी मोहिमेत ५१ हजार सभासद केले आहेत. ही छोटी गोष्ट नाही. ही सभासद नोंदणी हीच राजेंद्र राऊत यांची सक्रियता दर्शवते.

Rajendra Raut-Raosaheb Danve
Khadse Vs Mahajan : खडसे-महाजन वादापुढे केंद्रीय मंत्र्यानेही टेकले हात; दिलजमाईसाठीची शिष्टाई ठरली अयशस्वी!

भारतीय जनता पक्ष चांगल्या कार्यकर्त्याकडे लक्ष ठेवून असतो, जिथे कुठे संधी मिळेल, त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला संधी दिली जाते. माजी आमदार राजेंद्र राऊत यांना मी स्वतः चांगला ओळखतो. मुद्दाम मी वाट वाकडी करून त्यांना भेटण्यासाठी बार्शीत आलो आहे. त्यांचा राजकीय संच बघितला. त्यांच्या राजकीय भविष्यावर कुठल्याही प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही. राऊतांना राजकारणात भविष्य चांगले आहे आणि भारतीय जनता पक्ष त्यांची जरुर दखल घेईल, असं मला वाटतं, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

Rajendra Raut-Raosaheb Danve
Ranjitsinh Mohite Patil : कारवाई सोडा; भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटलांचे अभिनंदन अन्‌ कौतुक!

दानवे म्हणाले, आणखी दोन ते चार महिने जाऊ द्या. ज्यांना बार्शीच्या जनतेने निवडून दिले आहे, त्यांनी एक वर्षात किती निधी आणला आणि राजेंद्र राऊत यांनी किती निधी आणला होता, याची तुलना करणारी आपली जनता आहे. वर्षभरानंतर लोकांच्या लक्षात येईल की आपली केवढी मोठी चूक झाली आहे. बार्शीच्या विकासासाठी आपल्या दोन्ही सरकारकडून काही आणायचं असेल तर राजेंद्र राऊत यांच्यासारखा कार्यकर्ता आपल्याला हवा आहे. भाजपला त्यांना पुढं करावंच लागणार आहे. मी स्वतः त्यांचा समर्थक आहे, तुम्ही चिंता करू नका.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com