Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदमांनी भेट घेतली अजित पवारांची;पण गोडवे गायले शरद पवार, सुप्रिया सुळेंचे!

Ramesh Kadam Meet Ajit Pawar : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी अजित पवार यांच्या भेटीनंतर शरद पवारांप्रती आपली निष्ठा पुन्हा व्यक्त केली. पवारांनी कठीण काळात दिलेल्या मदतीमुळे त्यांना सोडण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी सांगितले.
Ramesh Kadam-Sharad Pawar-Ajit Pawar-Supriya sule
Ramesh Kadam-Sharad Pawar-Ajit Pawar-Supriya suleSarkarnama
Published on
Updated on
  1. रमेश कदम यांनी स्पष्ट केले की ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडणार नाहीत, कारण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांना कठीण काळात मोठी मदत केली आहे.

  2. ते म्हणाले की अजित पवार यांची भेट ही फक्त मोहोळ शहराच्या विकासासाठी निधीचा प्रस्ताव देण्यासाठी होती, त्याचा पक्षबदलाशी काहीही संबंध नाही.

  3. कदम यांनी राजू खरे यांच्यावर विश्वासघाताचा आरोप करत आगामी निवडणुकीत मोहोळची जनता त्यांना धडा शिकवेल, असा इशारा दिला.

Solapur, 09 December : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे, पक्षाच्या स्थापनेपासून मी ज्येष्ठ नेते शरद पवारांसोबत आहे. माझ्या अडचणीच्या काळात शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मला प्रचंड मदत केलेली आहे. त्यामुळे पवारांना सोडून इतरत्र जाण्याचा विषयच येत नाही, असे मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर सांगितले.

रमेश कदम (Ramesh Kadam) म्हणाले, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. मोहोळ नगरपालिका निवडणुकीत आम्ही जनतेला जी आश्वासनं दिली. त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी तसेच, मोहोळमध्ये मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता देणारा माणूस, अशी मोहोळमध्ये ओळख आहे.

त्यासंदर्भात आगामी अर्थसंकल्पात काही तरतूद करता याबाबतचा एक लेखी प्रस्ताव मी अजितदादा पवार (Ajit Pawar) यांना दिला आहे. अजितदादांना भेटलो म्हणजे लगेच पक्षबदल होतो, अशी कोणतीही भावना नाही आणि अशी कोणतीही चर्चा आमच्यात झालेली नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटीची वेळ मागताना भेटीचे कारणही दिले होते. मोहोळ शहरातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निधीची गरज भासेल. त्यासंदर्भातील प्रस्ताव मला द्यायचा आहे. आम्हाला फार मोठा निधी लागणार आहे, अशातला काही भाग नाही. आमची छोट्याशा निधीची मागणी आहे. पण, ही छोटी मागणीही मोहोळ शहाराच्या विकासात फार मोठी योगदान देऊ शकते, यासाठी मी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली.

Ramesh Kadam-Sharad Pawar-Ajit Pawar-Supriya sule
Rajendra Raut : बार्शी बाजार समितीतील विजयानंतर राऊतांची मोठी घोषणा; ‘ZPच्या सहा अन्‌ पंचायत समितीच्या 12 जागा...’

राजू खरे यांची लायकी नसताना त्यांना आमदारकीचं तिकिट देण्यात आलं आणि शरद पवार यांच्या नावावर, करिश्म्यावर ते निवडून आले. निवडून आल्यानंतर त्या खरेंनी पक्षाशी गद्दारी केली. पक्षाच्या विचाराला सोडून विरोधी पक्षाच्या लोकांच्या जवळ जाऊन पक्षाच्या विरोधात काम करत आहेत. अशा बेईमान आणि गद्दार माणसाला निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीत मोहोळची जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही रमेश कदम यांनी दिला.

ते म्हणाले, राजू खरे यांनी पक्षाचे धोरण स्वीकारले नाही, पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांना मानणारे आणि त्यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांसाठीही मोठी किंमत आहे. विधानसभेला तिकिट देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो.

Ramesh Kadam-Sharad Pawar-Ajit Pawar-Supriya sule
Raj Thackeray Post: बाबा आढावांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पुन्हा पुन्हा वाचावी अशी पोस्ट; अत्यंत महत्त्वाचा मुद्दा केला उपस्थित

पहिल्यांदा शरद पवार यांनी माझी मुलगी सिद्धी कदमला तिकिट दिले होते. पण, स्थानिक नेते बळीराम साठे, मनोहर डोंगरे यांच्या आग्रहामुळे हे तिकिट बदलण्यात आले आणि राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली. पण, ज्यांच्या आग्रहामुळे खरेंना उमेदवारी देण्यात आली, त्या साठेंनी अजित पवारांच्या पक्षात, तर मनोहर डोंगरे आज भाजपत आहेत.

1. रमेश कदम अजित पवारांना का भेटले?

→ मोहोळ शहराच्या विकासासाठी लागणाऱ्या निधीबाबत लेखी प्रस्ताव देण्यासाठी.

2. रमेश कदम पक्षबदल करत आहेत का?

→ नाही, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ते शरद पवारांसोबतच राहणार आहेत.

3. कदम यांनी राजू खरे यांच्यावर कोणता आरोप केला?

→ पक्षाशी गद्दारी करून विरोधी पक्षाच्या लोकांशी हातमिळवणी केल्याचा.

4. कदम यांच्या मते तिकिट बदलाचे कारण काय होते?

→ स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळे त्यांच्या मुलीऐवजी राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com