Ramesh Kadam : मुलीची उमेदवारी कापल्यानंतर रमेश कदमांनी घेतली पवारांची भेट; माघार की लढणार उत्सुकता कायम

Mohol Assembly Constituency : मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी रद्द करूनही माजी आमदार रमेश कदम यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरील आपली निष्ठा कायम ठेवल्याचे शनिवारी (ता. ०२ नोव्हेंबर) दिसून आले.
Sharad Pawar-Siddhi Kadam-Ramesh Kadam
Sharad Pawar-Siddhi Kadam-Ramesh KadamSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 02 November : मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी रद्द करूनही माजी आमदार रमेश कदम यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरील आपली निष्ठा कायम ठेवल्याचे शनिवारी (ता. ०२ नोव्हेंबर) दिसून आले. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने माजी आमदार कदम यांनी बागेत जाऊन शरद पवारांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मोहोळ मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवायची का नाही, याचा निर्णय उद्या घेणार असल्याचेही रमेश कदम यांनी स्पष्ट केले.

मोहोळ विधानसभा मतदारसंघातून (Mohol Assembly Constituency) अनपेक्षितपणे माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळमधून विद्यमान आमदार यशवंत माने आणि माजी आमदार रमेश कदम यांच्यात तुल्यबळ लढत होईल, असे चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सिद्धी कदम यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला.

सिद्धी कदम यांची उमेदवारी बदलावी, यासाठी मोहोळ मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करून ती राजू खरे यांना जाहीर करण्यात आली. खरे यांच्या उमेदवारीसाठी मोहोळ मतदार संघातील महाविकास आघाडीचे स्थानिक नेतेही अनुकूल होते, त्यामुळे खरे यांच्या पदरात आपसूकच तुतारीची उमेदवारी पडली.

Sharad Pawar-Siddhi Kadam-Ramesh Kadam
Sopal Meet Jarange Patil : राजेंद्र राऊतांचे कट्टर विरोधक दिलीप सोपलांनी घेतली जरांगे पाटलांची भेट

मोहोळ मतदारसंघातील उमेदवारी रद्द करूनही रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात अवाक्षरही काढले नव्हते. रमेश कदम यांनी तर आज दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची गोविंद बागेत जाऊन भेट घेतली. शरद पवार यांना पाडव्याच्या शुभेच्छा देतानाच भविष्याची राजकीय बेगमीही त्यांनी केल्याचे दिसून आले. सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द झाल्याची नाराजी मात्र त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती.

शरद पवार यांच्या भेटीनंतर रमेश कदम म्हणाले, राजकारणात अशा काही गोष्टी घडतात की आपल्याला कधी कधी थांबावं लागतं. काय कोठे गडबड झाली हे मलाही सांगता येत नाही. पण, ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्या मुलीवर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

Sharad Pawar-Siddhi Kadam-Ramesh Kadam
Vidharbh Politic's : अवघ्या पाच दिवसांत माजी मंत्र्याची काँग्रेसमध्ये घरवापसी

मोहोळमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यामुळे निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय मी उद्या (ता. ३ नोव्हेंबर) करणार आहे, असेही रमेश कदम यांनी सांगितले. शरद पवार यांच्या भेटीतून नक्की कोणता मेसेज मिळाला, हे रमेश कदम यांच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com