Sopal Meet Jarange Patil : राजेंद्र राऊतांचे कट्टर विरोधक दिलीप सोपलांनी घेतली जरांगे पाटलांची भेट

Barshi Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीत बार्शी मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून माजी मंत्री दिलीप सोपल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर त्यांच्या विरोधात आमदार राजेंद्र राऊत हे शिवसेनेकडून लढत आहेत.
Dilip Sopal Meet Manoj Jarange Patil
Dilip Sopal Meet Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 02 November : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शुक्रवारी (ता. 01ऑक्टोबर) मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. काही दिवसांपूर्वी आमदार राऊत यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत आंदोलन केले होते, त्यामुळे सोपल यांनी जरांगे पाटील यांची भेट घेणे विशेष महत्वाचे ठरत आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले होते. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राजकीय वास येत असल्याचा आरोप आमदार राऊत यांनी त्या वेळी केला होता. बार्शीत येऊन आमदार राऊत यांच्या घरासमोर सभा घेण्याचे आव्हान जरांगे पाटील यांनी दिले होते. त्या वेळी राऊतांनी दिलीप सोपल यांच्याकडून माझ्याविषयी चुकीची माहिती जरांगे पाटील यांना दिली जात असल्याचा आरोपही केला होता.

त्या पार्श्वभूमीवर दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणे महत्वपूर्ण मानले जात आहे. या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील मिळू शकला नसला तरी विधानसभा निवडणुकीत मदत करण्याची विनंती सोपल यांच्याकडून केली गेली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Dilip Sopal Meet Manoj Jarange Patil
Vidharbh Politic's : अवघ्या पाच दिवसांत माजी मंत्र्याची काँग्रेसमध्ये घरवापसी

दरम्यान, आमदार राजेंद्र राऊत यांनी महिनाभरापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आवाज उठवत आंदोलन केले होते. तसेच, बार्शीतील काही लोकांनीही एकत्र येत जरांगे पाटील यांना काही प्रश्न विचारले होते. मात्र, त्याची उत्तरे न दिल्याने बार्शीत जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते.

राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्यानंतर बार्शीतील सकल मराठा समाजाच्या काही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी बार्शीत राजेंद्र राऊत यांच्या घरासमोर सभा घेण्याचे जाहीर केले होते, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे बार्शीत सभा घेणार का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Dilip Sopal Meet Manoj Jarange Patil
Chikhali Political Crime : बसप उमेदवारावर चिखलीत जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक, बुलडाण्यात खळबळ

विधानसभा निवडणुकीत बार्शी मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून माजी मंत्री दिलीप सोपल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे शिवसेनेकडून लढत आहेत. बार्शीत या दोन तुल्यबळ नेत्यांमध्ये अटीतटीची लढाई पहायला मिळू शकते. त्यातच मनोज जरांगे पाटील यांची भूमिका बार्शी मतदारसंघात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com