Shivsena Controversy : हिवाळी अधिवेशनाआधीच नवा वाद ? 'या' ठिकाणाहून शिवसेनेची 'मशाल'च गायब

Winter Session News : नागपूर येथील विधानभवन परिसरात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांसह विविध प्रमुख पक्षांची कार्यालये आहे.
Shivsena - Uddhav Thackeray
Shivsena - Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेचे हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी नागपूर येथे सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्यासाठी तोफगाळा सज्ज केला आहे.याचाच भाग म्हणून त्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष देखील विरोधकांचं आव्हान परतवून लावण्यासाठी पूर्ण तयारीनिशी अधिवेशनात उतरणार आहे.

पण आता हिवाळी अधिवेशनाआधीच नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे मशाल हे चिन्हच नागपूर येथील विधानभवन परिसरातील पक्ष कार्यालयावरुन गायब झाले आहे. यामुळे ठाकरे गट पेटून उठण्याची चिन्हे आहेत.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवारी (ता.7 डिसेंबर) सुरू होत आहे. हे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या अधिवेशनात विधानभवन सज्ज झाले आहे.राज्यात एकीकडे मराठा आरक्षण,ओबीसींच्या मागण्या,पीक विम्याचा मुद्दा, अवकाळी पाऊस-गारपिटीमुळं झालेलं नुकसान, दंगली, कायदा व सुव्यवस्थेवरील मुद्दे, ललित पाटीलचे ड्रग्ज प्रकरण,जालन्यातील अंतरवली सराटी येथील लाठीचार्ज, बीडमधील हिंसक घटना, या विषयांवरुन अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. त्याचसोबत आता ठाकरे गटही सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Shivsena - Uddhav Thackeray
Revanth Reddy: रेवंथ रेड्डीजी, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही पेटून उठायला शिकवा!

नागपूर येथील विधानभवन परिसरात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांसह विविध प्रमुख पक्षांची कार्यालये आहे. या कार्यालयाबाहेरील फलकावर संबंधित पक्षाच्या नावांसह चिन्हांचा देखील समावेश आहे.परंतु, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मशाल हे चिन्ह विधानभवनातील कार्यालयाच्या फलकावर आढळून आलेले नाही.त्या फलकावर फक्त शिवसेना(Shivsena) पक्ष कार्यालय एवढंच लिहिलं आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. तसेच शिंदे यांच्या गटाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हावरही दावा केला होता.केंद्रीय निवडणूक आयोगाने हंगामी आदेशामध्ये शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षनाव आणि ‘ढाल-तलवार’ या निवडणूक चिन्हाचे वाटप केले होते.

मात्र,निवडणूक आयोगाने त्यानंतर राज्याच्या विधिमंडळात आणि संसदेतील बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘ शिवसेना’ हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले होते.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि ‘ मशाल’ हे निवडणूक चिन्ह वापरण्याची मुभा ठाकरे गटाला देण्यात आली आहे.(Uddhav Thackeray)

Shivsena - Uddhav Thackeray
Mission 29 : सातही जागा गमावलेल्या जिल्ह्यात ‘मामां’ची धाव; महिलांचे पाय धुतले अन् ‘मिशन २९’ ची घोषणा

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले आहे.याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात पुढील सुनावणी घेणार आहेत.अधिवेशन संपल्यानंतर लगेच कागदपत्रे मुंबईला आणणे कठीण आहे. त्यामुळे सुनावणी नागपूरला होणार असल्याची माहिती आहे. (Winter Session)

(Edited By Deepak Kulkarni)

Shivsena - Uddhav Thackeray
Kolhapur Politics : बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटलांना झटका; के. पी. पाटील लय भारी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com