Satara Loksabha News : उदयनराजेंसाठी गिरीश महाजनांची समझोता एक्स्प्रेस; बंद दाराआड चर्चा सुरू...

Udayanraje Bhosale सातारा लोकसभेची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.
Udayanraje Bhosale, Girish Mahajan
Udayanraje Bhosale, Girish Mahajansarkarnama
Published on
Updated on

Satara Loksabha News : सातारा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादंग सुरू आहे. राष्ट्रवादीला जागा सोडल्याच्या चर्चेवरून खासदार उदयनराजे समर्थक आक्रमक झाले आहेत, तर उदयनराजेंनीही कमळ चिन्हावरच निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले व त्यांचे समर्थक यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे नेते ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आज सकाळी साताऱ्यात आले. त्यांनी उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच दोन्ही नेत्यांत तासभर बंद दाराआड चर्चा झाली.

सातारा लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार यांची राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. बैठकांवर बैठका होत असतानाच साताऱ्यात मात्र ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह नेत्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यावरच आक्षेप घेतला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोपही उदयनराजे समर्थक करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत खासदार उदयनराजे भोसले यांनाच उमेदवार मिळाली पाहिजे, यासाठी समर्थक आक्रमक झाले आहेत.

Udayanraje Bhosale, Girish Mahajan
Satara Loksabha Constituency : उमेदवारी यादीत उदयनराजेंचं नाव नसल्याने साताऱ्यात समर्थक आक्रमक!

या पार्श्वभूमीवर महायुतीतील हा संघर्ष मिटविण्यासाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आज साताऱ्यात दाखल झाले आहेत. त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच राजमाता कल्पनाराजे भोसले यांचीही भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर गिरीश महाजन व खासदार उदयनराजे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही नेत्यातील चर्चेतून काय बाहेर येणार याची उत्सुकता आहे. गिरीश महाजन उदयनराजेंची समजूत काढण्यात यशस्वी होणार का, याकडे लक्ष लागले आहे, तर गिरीश महाजन यांच्यापुढे खासदार उदयनराजे समर्थक आक्रमक भूमिका घेणार का याची उत्सुकता आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Udayanraje Bhosale, Girish Mahajan
Udayanraje Bhosale News : उदयनराजेंचे सूचक वक्तव्य; म्हणाले, मी काय संन्यास घेणार नाही, लढणारच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com