डिसले गुरुजी पुन्हा अडचणीत! 'डाएट'च्या प्राचार्यांनी आणलं सत्य समोर

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
Ranjitsinh Disale
Ranjitsinh Disale Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. डिसले गुरुजींच्या ज्ञानाचा विद्यार्थी आणि शिक्षकांना फायदा व्हावा यासाठी त्यांची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर (डाएट) प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. मात्र, तीन वर्षांत एकदाही डिसले गुरूजी डाएटकडे फिरकले नाहीत, असा गौप्यस्फोट डाएटचे प्राचार्य डॉ.रामचंद्र कोरडे यांनी केला आहे.

प्राचार्य कोरडे म्हणाले की, डाएटच्या माध्यमातून 42 हजारहून अधिक विद्यार्थी आणि दीड हजाराहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याचा दावा डिसले यांनी केला आहे. प्रत्यक्षात डाएटकडे अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. वस्तुस्थिती म्हणजे असे प्रशिक्षण देण्याचा आदेशही अद्यापपर्यंत डाएटला देण्यात आलेला नाही. डिसले या प्रतिनियुक्तीच्या दोन वर्षांच्या काळात एकदाही डाएटमध्ये हजेरी लावली नाही. नंतर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली. या काळातही ते डाएटमध्ये फिरकले नाहीत.

Ranjitsinh Disale
मोदी सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत; पोलिसांनी आवळला फास

डिसले गुरुजींवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी 11 महिन्यांपूर्वी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल मान्य करण्यात आला आहे. त्यानुसार डिसले गुरुजींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून, .याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली होती. तीन वर्षे कामावर हजर न राहता त्यांनी पगार घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी हा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. यावर आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, डिसले गुरुजींनी अमेरिकेत पीएचडी (PHD) करण्यासाठी सोलापूर शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांची रजा मागितली होती, त्याला सोलापूर जिल्हा परिषद शिक्षाण विभागाकडून त्रुटी आहेत, असे सांगून नकार देण्यात आला होता. त्यांना पुन्हा मुख्याध्यापकांकडे अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. यावर ज्या व्यवस्थेमध्ये आपल्या कामाचा आदर केला जातं नाही, अशा ठिकाणी काम करण्याच्या मानसिकतेमध्ये मी सध्या नाही. मी लवकरच राजीनामा देणार आहे, अशी भावना डिसले गुरुजींनी व्यक्त केली होती.

Ranjitsinh Disale
फडणवीसांनी तीन वेळा नारळ आपटला अन् विधानसभा अध्यक्ष मैदानात!

डिसले गुरुजींची रजा मंजूर करण्यात न आल्याच्या प्रकाराची गंभीर दखल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी घेतली होती. त्यांनी डिसले यांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी ट्विटरवर म्हटले होते की, सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com