Rajendra Hagawane: संतापजनक! अमानुष छळानंतर सून वैष्णवीची आत्महत्या; तरी राजेंद्र हगवणेला पश्चाताप नाहीच, पण मुजोरी...

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. मात्र,वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर 19 ते 20 व्रण आढळून आले होते.
rajendra hagawane  (1).jpg
rajendra hagawane (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील मुळशी येथील महाराष्ट्राला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे संशयास्पद मृत्यू प्रकरणातील आरोपी सासरे राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशील हगवणेच्या बावधन पोलिसांनी शुक्रवारी (ता.23) मुसक्या आवळल्या. हगवणे बाप बेटे हे गेल्या सात दिवसांपासून पोलिसांना चकवा देत फरार होते. पण अखेर पोलिसांनी ट्रॅप लावत पहाटे 4.30 वाजताच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे स्वारगेट परिसरातून बेड्या ठोकल्या. पण या अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा माज कायम असल्याचं दिसून आल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.

बावधन पोलिसांनी अटक केल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशीलला बेड्या ठोकून पोलिस स्टेशनला आणलं, त्यावेळी पत्रकारांनी पश्चात्ताप होतो का? अशी विचारणा केली.त्यावर नकारार्थी आणि उद्धटपणे हात हलवून नकारार्थी इशारा दिला.छळाला,मारहाणीला कंटाळून तरुण सुनेनं जीवन संपवलं. याचा यत्किंचितही पश्चात्तापाची भावना तर नाहीच,उलट माजोरडेपणाच राजेंद्र हगवणेच्या कृतीतून दिसून आला.

वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेंच्या अटकेनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत अटकेसंदर्भातील कारवाईची माहिती दिली.वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सासरा व दिर पुणे शहर व इतर भागात फिरले. राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे बावधनच्या मुहूर्त लॉन्स ,कोल्हापूर, पवनानगर ,तळेगाव ,स्वारगेट या भागात वास्तव्य केलं. या भागातले सीसीटीव्ही पोलिसांना हाती लागले आहेत.

बावधन पोलिसांनी पत्रकार परिषदेत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती दिली. याप्रकरणी यापूर्वी तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यात वैष्णवीचा नवरा शशांक,बहीण करिष्मा आणि सासू लता हगवणे यांचा समावेश होता.पण सासरे आणि दीर असे दोघे जण फरार होते. त्यांना शोधण्यासाठी सहा पथकं तैनात करण्यात आली होती.

rajendra hagawane  (1).jpg
Nilesh Chavan News: आधी वैष्णवीच्या कुटुंबियांवर बंदुक रोखली,आता निलेश चव्हाणची दुसरी काळी बाजू समोर; स्पाय कॅमेऱ्यानं पत्नीचेच व्हिडीओ...

यात पुणे स्वारगेट येथून वैष्णवीचा सासरा आणि दीर या दोघांना शुक्रवारी(ता.23) पुणे शहरातील स्वारगेट येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे आम्ही गोळा केले असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लवकरच प्रकरणाच्या मुळाशी पोहचू असा विश्वासही पोलिसांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती.मात्र,वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर 19 ते 20 व्रण आढळून आले होते.त्यामुळे वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली.त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर वाद घालणं सुरू केले.

rajendra hagawane  (1).jpg
Rajendra Hagwane Arrest : राजेंद्र हगवणेला लपण्यासाठी कोणी मदत केली, सगळं बाहेर येणार! भावाचीही चौकशी

तिच्या चारित्र्यावरून टोमणे मारत वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ करणं सुरु केलं होतं. पती,सासू-सासरे,नणंद,दीर यांच्याकडून तिला सातत्यानं अपमानास्पद वागणूक दिली जात होती. याचमुळे अखेर तिनं टोकाचं पाऊल उचललं.

वैष्णवी हगवणे प्रकरणी रात्री उशिरा पिंपरी पोलिसांच्या पथकाकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. फरार काळात हगवणे पिता-पुत्रांनी हॉटेलमध्ये मटणावर ताव मारला. तळेगावतील एका हॉटेलमध्ये सीसीटीव्ही समोर आलाय. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ट्रॅक केल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com