

Gokul Politics : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवड आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मोठा डाव खेळला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या समविचारी आघाडीचा कोणत्याही परिस्थिती अध्यक्ष होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली असून उद्या होणाऱ्या निवड सभेत महायुतीकडून एकही संचालक उपस्थित राहणार नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
बुधवारी रात्री उशिरा पर्यंत सभेला उपस्थित राहायचे की नाही? याबाबत महायुतीच्या संचालकांना कोणताच निरोप देण्यात आला नसल्याने संभ्रमात होते. दरम्यान, महायुती कडून गोकुळ दूध संघावर पुन्हा प्रशासक अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये 'गोकुळ'ची सत्ता आमदार सतेज पाटील यांच्याकडे जाणार नाही, यासाठी महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. महायुतीचे सर्व संचालक गोव्यामध्ये आहेत. तेथे महायुतीचे नेते आणि संचालक यांच्यात दुपारी बैठक झाली. त्यात हा निर्णय झाल्याचे समजते; मात्र या बैठकीहून परत आलेले पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी याबाबतचे निर्णय जाहीर केले नाहीत. आज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका जाहीर केली जाईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, गोव्यामध्ये झालेल्या बैठकीत काही संचालकांनी दोन पावले मागे येऊन अध्यक्ष निवड करून घेऊ, अशी भूमिका घेतली; मात्र नेत्यांकडून अध्यक्ष निवडीस गैरहजर राहूनही निवड लांबणीवर टाकण्याचा सल्ला दिला. यानंतर मिळणाऱ्या कालावधीत शासन नियुक्त प्रतिनिधीच्या माध्यमातून सत्तापालट करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत महायुती संभ्रमावस्था असल्यामुळे त्यांनी कोणताही निर्णय अधिकृत जाहीर केलेला नाही; मात्र अध्यक्ष निवडीस गैरहजर राहून सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
या निर्णयात काही बदल झाल्यास गोव्यातून थेट कोल्हापुरात येण्यासाठी स्वतंत्र विमानाचेही नियोजन केल्याचे समजते. सध्या गोकुळमध्ये समविचारी आघाडीचे १३ संचालक, तर महायुतीचे १२ संचालक आहेत. अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांची गरज आहे. महायुतीचे संचालक गैरहजर राहिल्यास कोरमअभावी निवड सभा होऊ शकणार नाही. तसे झाले तर गोकुळ अध्यक्ष निवड दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गोव्यात झालेल्या बैठकीत अनेक संचालक आणि नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला विरोध केला. मात्र ऐका वरिष्ठ नेत्याकडून उपस्थित राहू नये असे स्पष्ट कळवले. शिवाय गोकुळ मधील काही कर्मचाऱ्यांवर आतापासून दबाव टाकला जातं असून काही कर्मचाऱ्यांनी आपली भेट घेतली आहे. त्यामुळे भविष्यातील ही परिस्थिती रोखण्यासाठी समोरील गटाचा अध्यक्ष करू नये, असा दाखला दिला. शिवाय एका तालुक्यात लावलेल्या फलकाचा उल्लेख करण्यात आला. "एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि तीन मंत्री, दहा आमदार तरी बारा तेरा, गोकुळमध्ये महायुतीला नाही थारा" असा फलक लावल्याचा सांगत एका वरिष्ठ नेत्याने त्याबाबत संताप व्यक्त केला. त्यामुळे अजूनही महायुती सभेला उपस्थित राहणार नसल्याचे समोर येत आहे.
दरम्यान भाजप कडून शासन नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधीकार देण्याचा प्रकार बरगळला असून आज होणाऱ्या सभेला अनुपस्थित राहून सभा तहकुब करायची. दिवाळी नंतर पुन्हा सभा लावायची. मिळालेल्या वेळेत समविचारी आघाडीचे काही संचालक हाथी लागतात कां? यासाठी प्रयन्त सुरु ठेवायचे. असे प्रयत्न महायुतीच्या नेत्याकडून सुरु आहेत. जर असं झालं नाही तर पुढील दोन सभेला अनुपस्थित राहून संघावार प्रशासक अध्यक्ष बसवण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.