Gokul Chairman Election : 'गोकुळ'चे संचालक सहलीवर, अध्यक्षपद निवडीत 'गेम' होणार? सतेज पाटलांकडून खबरदारी!

Satej Patil Mahayuti : गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक 29 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सतेज पाटील यांनी संचालकांना कर्नाटकला सहलीवर पाठवले आहे.
Satej Pati Gokul Election
Satej Pati Gokul Electionsarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul News : गोकुळची निवडणूक राज्यभर गाजली. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला 13 जागा मिळाल्या आहेत. त्यांचा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. मात्र, अध्यक्ष निवडीच्या वेळी दगाफटका होऊ नये म्हणून त्यांनी 'समविचारी'च्या संचालकांना कर्नाटकमध्ये सहलीला पाठवले आहे.

समविचारीकडून संचालक सहलीला गेला असताना महायुतीने देखील खबरदारी घेतली आहे. महायुतीचे संचालक उद्या (रविवारी) गोव्याला सहलीला जाणार आहे. अध्यक्ष निवडीवेळी 14 संचालक उपस्थित असणे गरजेचे आहे. कोरम पूर्ण झाल्यानंत अध्यक्ष निवड होईल. त्यामुळे महायुतीकडून देखील आपले संचालक फुटू नये म्हणून काळजी घेतली जात आहे.

गोकुळ निवडणूक राज्यभर गाजली. महायुती शक्तिशाली दिसत असताना सतेज पाटील यांनी सत्ता खेचून आणली. 25 सदस्य असलेल्या गोकुळच्या संचालक मंडळात पाटील यांच्या समविचार आघाडीचे 13 सदस्य विजयी झाले आहेत. तर, महायुतीचे 12 सदस्य विजयी झाले आहेत. त्यामुळे पाटील यांच्याकडे काठावरचे बहुमत आहे.

Satej Pati Gokul Election
Gokul Election: गोकुळमध्ये पराभव झालेल्या महायुतीने पुन्हा दंड थोपटले : अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणनीती 28 तारखेला ठरणार

महायुतीकडून हालचाली, डाव टाकणार...

नुकतीच महायुतीच्या गोकुळमधील विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली. मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आमची पुन्हा २८ ऑक्टोबरला बैठक होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीवेळी काय रणनीती आखायची हे या बैठकीत ठरणार असल्याची देखील चर्चा आहे.

Satej Pati Gokul Election
Gokul Election Result : 'गोकुळ'मध्ये सत्ता येऊनही सतेज पाटलांची अडचण : अध्यक्ष निवडणुकीत महायुतीचा एक संचालक फोडावा लागणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com