

Satej Patil News : गोकुळ अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. मात्र, महायुतीचे संचालक सभेसाठी येणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता असून गोकुळवर प्रशासकराज येण्याची ही शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी थेट महायुतीच्या संचालकांना आवाहन करत म्हटले की, साडेपाच लाख शेतकऱ्यांनी आम्हाला बहुमत दिलेले आहे.
कोरमचा मुद्दा उपस्थितीत न करता महायुतीच्या संचालकांनी सभेसाठी उपस्थित राहावे. काही संचालकांसोबत माझे बोलणे झाले आहे. त्यातील काहींचे मत आहे की हे कुठेतरी थांबले पाहिजे, या सभेसाठी यावं काही संचालकांचे मत आहे. पण त्यांचा निर्णय नेत्यांच्यावर अवलंबून आहे.या 12 संचालकांची आम्ही वाट ११ वाजेपर्यंत पाहणार आहोत. साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत, असे पाटील यांनी सांगितले.
गोकुळच्या अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वमूमीवर सरकार तज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकारी देण्यासाठी कायदा बदल करणार असल्याची चर्चा आहे. या बाबात बोलतान सतेज पाटील म्हणाले की, शासन अशा पद्धतीने निर्णय घेणे हे दुर्दैवी आहे. मतासाठी असा बदल केला तर लोकशाहीला काय अर्थ राहणार नाही. असे असेल तर निवडणुकाच घेऊ नका. सहकारी संस्थांमध्ये जर तज्ञ संचालकांना मताचा अधिकार दिला तर सर्वच संस्था महापालिकांमध्ये अधिकार द्यावे लागतील. एकट्या गोकुळसाठी हा कायदा करणे हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. आणि कायदा केला तर तो टिकणार नाही.
सतेज पाटील पुढे बोलताना म्हणाले, आपण महायुतीच्या सर्व नेत्यांची चर्चा केलेली आहे. पण शेवटी निर्णय त्यांचा आहे. महायुतीचा एक ही संचालक आमच्यात येणार नाही किंवा आमचा एक ही संचालक त्यांच्याकडे जाणार नाही. दरम्यान, चुयेकरांचा मुलगा अध्यक्ष होत असेल तर त्याला अडवायचा प्रयत्न होत असेल तर कोल्हापूरकर हे सहन करणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.