

Gokul Politics : गोकुळ निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुती व समविचारी आघाडीकडून सावध डाव टाकले जात आहेत. अशातच अध्यक्ष निवडीत कोणताही दगा फटका होऊ नये, यासाठी दोन्ही आघाडीकडून संचालकांना सहलीवर पाठवण्याचे नियोजन आहे. मात्र
गोकुळच्या अध्यक्ष निवडीत शांततेने घ्यायचे नंतर भूकंप घडवायचा अशी काहीशी रणनीती महायुतीकडून होऊ शकते. सत्तेतील पूर्वेकडील आमदारांनी थेट गोकुळमध्ये आमचाच अध्यक्ष होईल, असा थेट दावा केला आहे.
समविचारी आघाडीचे 13 संचालक विजयी झाले आहेत. तर, महायुतीचे 12 संचालक विजयी झाले आहेत. या परिस्थितीमध्ये अध्यक्ष निवडीच्यावेळी 14 सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. कोरम पूर्ण झाल्यानंतरच अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
अध्यक्ष निवडीसाठी एकूण संचालकांच्या ५० टक्के आणि अधिक एक संचालक सभेला उपस्थित आवश्यक आहे. विरोधक हजर राहिले नाहीत, तर निवड होणार नाही. सलग तीन सभेला गैरहजर राहिल्यास प्रशासक नियुक्तीसाठी मुंबईतून प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन आठवड्यांत निवडणुका घ्याव्या लागतील.
गेल्या सहा महिने सुरु असलेल्या वादाचा फटका महायुतीला बसला. त्याचा परिणाम व पडसाद गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत उमटले. महायुतीचे बद्दल असंतोष पसरल्याने सध्या दूध उत्पादक मतदारांची सहानुभूती मिळविणे आवश्यक आहे. अद्याप याबाबत निर्णय झाला नसला, तरीही 'वेट अॅण्ड वॉच'च्या भूमिकेत महायुती दिसत आहे.
गोकुळमधील पराभव मान्य केला असला, तरीही नेत्यांच्या मनात सल कायम आहे. सध्या दूध उत्पादकांनी महायुतीला सत्तेपासून दूर ठेवले आहे. नियमाच्या कचाट्यातून महायुती संघातील सत्ताधाऱ्यांना जेरीस आणू शकते. मात्र, असे कोणतेही पाऊल महायुतीकडून उचलले जाणार नसल्याचे दिसते.
गोकूळ दूध संघाचे संस्थापक (कै.) आंनदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी समविचारीमधून पुढे आले आहे. त्यामुळे महायुतीने अध्यक्ष निवडीला विरोध केला, तर गोकुळच्या संस्थापकांच्या नावाला विरोध होणार आहे. यातून पुन्हा दूध उत्पादकांची नाराजी ओढवली जाणार आहे. त्यामुळे तूर्तास शांत राहायचे अध्यक्ष निवड झाल्यानंतर कारभारात सहभागी व्हायचे, असे धोरण महायुतीमध्ये निश्चित होत असल्याचे संकेत आहेत. मात्र, भविष्यात संधी मिळताच सत्ताधाऱ्यांकडील संचालकांना आपल्याकडे घेऊन सत्तांतर घडविण्याची संधी सोडली जाणार नाही. यासाठी सध्या शांततेने घेतले जाईल असे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.