

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप यादीवरील आलेल्या हरकतीवर निर्णय घेत दुग्ध निबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी नारायण पर्जने यांनी 789 संस्था अपात्र तर 274 संस्था पात्र ठरवल्या. मात्र मध्यरात्री पर्यंत कार्यालयात सुरू असलेल्या गोंधळ आणि राड्यामुळे आणखी दीडशे संस्था पात्र करण्यात आल्या. मात्र तक्रारदार आणि संस्थाचालक एकत्र आल्यानंतर महाडिक व मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने शाब्दिक चकमक उडाली. मध्यरात्री उशिरापर्यंत चालू झालेल्या या गोंधळामुळे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
निवडणूक निर्णय अधिकारी परजणे आणि माजी सत्ताधारी संचालकांच्या झालेल्या बैठकीत, कार्यक्षेत्राबाहेरील ३२५ पैकी १५० नावे पुन्हा मतदार यादीत घेण्यात आली आहेत. त्यांना पात्र करण्यात आले. सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर आमच्या आग्रहास्तव फेरतपासणी झाली असल्याचे माजी संचालक अजित नरके यांनी सांगितले.
याचसोबत १७५ दूध संस्था अपात्र केल्या आहेत, त्यांच्यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही स्पष्ट केले. ‘आम्ही आग्रह धरल्यानंतर १५० संस्था पात्र झाल्या. त्या ३२५ संस्थांची कागदपत्रे न तपासताच त्यांना अपात्र केले होते. यातून ‘दाल में कुछ काला है’, हे स्पष्ट झाल्याचे भैया माने म्हणाले.
गोकुळ दूध संघाच्या प्रारूप (कच्च्या) मतदार यादीतील 639 संस्थांना आज अपात्र ठरविण्यात आले. वैयक्तिक आणि संस्था पातळीवरील १४८ आणि गोकुळ संघाचे ठेकेदार आणि कर्मचारी असलेल्या १२६ अशा २७४ संस्थांना पात्र ठरविले आहे.
न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या ६७७ संस्थांचा निकाल प्रलंबित ठेवण्यात येत असल्याची माहिती प्रभारी विभागीय उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी नारायण परजणे यांनी आज सायंकाळी दिली. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये ४ हजार ८९७ संंस्थांचा समावेश होता.
याविरोधात १७४० हरकती दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी घेऊन आज सायंकाळी परजणे यांनी गोकुळच्या काही माजी अध्यक्ष-संचालकांच्या उपस्थितीत निकाल जाहीर केला. यावेळी त्यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या अवसायनातील निकालातील १९२ संस्थांच्या नावांचा मतदार यादीत समावेश करावा, अशी मागणी केली होती.
पुणे विभागीय उपनिबंधकांच्या निर्णयातील २९८ पैकी पात्र २७२ संस्थांची सुनावणी झाली. या सर्व संस्थांना अपात्र ठरविले. अशा अवसायनातील ४६४ संस्थांनाही अपात्र ठरविले. संचालक मंडळाने ठराव करण्याच्या कालावधीत या संस्था अवसायनात असल्याने हा निर्णय दिला.
याशिवाय कार्यक्षेत्राबाहेरील ३२५ प्रतिनिधी आहेत, अशा हरकती होत्या. त्यामध्ये सभासदांची मूळ कागदपत्रे मिळालेली नाहीत, पत्ता चुकीचा आहे, अशा कारणांमुळे कार्यक्षेत्राबाहेरील ठरावधारक आहे, म्हणून त्या संस्थांना पात्र व केवळ ठरावधारकांना अपात्र ठरविले आहे. त्यामुळे या संस्थांना त्यांचे ठरावधारक बदलून घेता येणार आहेत.
याशिवाय तत्कालीन सहायक निबंधक सुजय कदम यांनी निर्णय दिलेल्या २६७ संस्था होत्या. त्या निर्णयाच्या विरोधात विभागीय सहनिबंधक (मुंबई) यांच्याकडे अपील सुरू आहे. त्यामुळे त्या संस्थांबाबत निर्णय घेतलेला नाही. मात्र, या संस्था मतदार यादीत आहेत. तसेच नियमबाह्य नोंदणीच्या ४१० संस्थांना अपात्र ठरविण्याबाबत हरकती होत्या. सहकार न्यायालयात सुनावणी सुरू असल्यामुळे त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे परजणे यांनी सांगितले. कर्मचारी, ठेकेदार पात्र गोकुळ दूध संघाचे १४८ कर्मचारी किंवा ठेकेदार आहेत, त्यांना अपात्र करावे, अशी हरकत होती. कायदा, दूध संघाच्या उपविधी यांच्यात कोठेही अपात्र ठरविण्यासंदर्भात तरतूद नसल्यामुळे ते सर्व ठराव पात्र ठरविले.
मतदानासाठी ७८९ संस्था अपात्र
दृष्टिक्षेपात निकाल गोकुळकडून सभासदांची दिलेली यादी ५४७०
कच्च्या यादीतील संख्या ४८९७
ठरावावरील हरकतींची संख्या १७४०
अपात्र संस्थांची संख्या ७८९
प्रलंबित संस्थांच्या निकालाची संस्था ६७७ पात्र संस्थांची संख्या १४८
व्यक्तिगत हरकती पात्र संस्था १२६
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.