Gokul Election : गोकुळच्या राजकारणात ‘किकवी बॉम्ब’ : मुश्रीफ पिता-पुत्र भाजपच्या टार्गेटवर; ED चौकशीची मागणी

BJP Leader Rajvardhan Naik Nimbalkar Demands ED Probe Into Gokul Dairy Kikvi Plant Purchase Deal : गोकुळ दूध संघाने पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील किकवी येथे 'अनंत मिल्क'चा दूध प्लांट आणि जमीन खरेदी केली आहे, ज्याचा उच्चार किंवा लेखनात अनेकदा 'कीवी' असा गैरसमज होतो.
Gokul Dairy Election
Gokul Dairy ElectionSarkarnama
Published on
Updated on

Gokul Election Political News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. किकवी येथील प्लांट खरेदी व्यवहारावरून आता भाजपनेच आक्रमक भूमिका घेत या व्यवहाराची स्वतंत्र आणि सखोल चौकशी एसआयटी किंवा ईडीमार्फत करण्याची मागणी केली आहे. भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी ही मागणी केली असून, या भूमिकेमुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गोकुळचे माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपासून गोकुळच्या किकवी येथील प्लांट खरेदी व्यवहारावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या व्यवहारात अधिक पैसे मोजण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांना थेट प्रत्युत्तर देण्याऐवजी किंवा व्यवहार पारदर्शक असल्याचे स्पष्ट करण्याऐवजी महायुतीतीलच काही संचालक आणि नेते वेगवेगळ्या दिशेने आरोप करत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे

याच पार्श्वभूमीवर भाजपने आता हा व्यवहार चौकशीच्या कक्षेत आणण्याची भूमिका घेतली आहे. किकवी प्लांट खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे आणि सखोल चौकशी एसआयटी किंवा ईडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचे राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

Gokul Dairy Election
Gokul Election : गोकुळमध्ये मोठा भूकंप : अवघ्या अर्ध्या तासात निवडणूक अधिकाऱ्याची बदली; अदृश्य शक्तीचा हसन मुश्रीफांना धक्का

‘व्यवहार चोख असेल तर चौकशीला घाबरण्याचे कारण काय?’

खर्च, बचत आणि देयकांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

गायत्री कोल्ड स्टोरेजच्या व्यवहारावरही सवाल

गोकुळ निवडणुकीआधी महायुतीतच नवा संघर्ष?

Gokul Dairy Election
Gokul Election : सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर गोकुळची प्रारूप मतदार यादी, 542 संस्था उडवल्या, 4 हजार 897 संस्थांना मतदानाचा अधिकार

काय आहे किकवी प्लांट प्रकरण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com