Hasan Mushrif : गोकुळच्या सुनावणीसाठी रोहतगींना ८० लाख देण्याचे सरकारचे आदेश; पण मंत्री मुश्रीफांना कल्पनाच नाही, म्हणाले, 'माहिती घेतो!'

Hasan Mushrif statement on Mukul Rohatgi fee : गोकुळच्या राजकारणाला पुन्हा एकदा उकळी फुटली असून महायुतीने दिलेल्या वकिलांच्या शुल्कावरून नवा वाद रंगताना दिसत आहे.
Gokul government appointed directors controversy; Hasan Mushrif And Mukul Rohatgi
Gokul government appointed directors controversy; Hasan Mushrif And Mukul RohatgiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : अध्यक्ष निवडीनंतर शांत झालेल्या गोकुळच्या राजकारणाला पुन्हा एकदा उकळी फुटली आहे. चार शासननियुक्त संचालकांच्या न्यायालयीन लढाईसाठी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना ८० लाख रुपये देण्याचा राज्य सरकारचा शासन निर्णय व्हायरल झाला आहे. पण गोकुळच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रोहतगी यांच्या शुल्काबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

'सरकारची बाजू मांडली असेल तर सरकार फी देणार'

मुकुल रोहतगी यांना देण्यात येणाऱ्या शुल्काबाबत पत्रकारांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारला. त्यावर रोहतगी यांना किती फी दिली, याची माहिती घेईन, असे मुश्रीफ यांनी सांगितले. पण सरकारची बाजू मांडली असेल तर सरकार फी देणार आणि आमची बाजू मांडली असेल तर आम्ही देणार. आतापर्यंतची फी आम्ही स्वतःच्या खिशातून दिली असल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचा आदेश योग्य की अयोग्य, याबाबत न्यायालयात सरकारची बाजू मांडण्यात आली आहे. पण सरकारची भूमिका न्यायालयाला पटवून देण्यासाठी ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचेही मुश्रीफ म्हणाले. त्याचवेळी गोकुळचा वाद आता संपवूया, अशी भूमिका यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मांडली होती, याची आठवणही मुश्रीफ यांनी करून दिली.

Gokul government appointed directors controversy; Hasan Mushrif And Mukul Rohatgi
Hasan Mushrif : 'माझ्यामागे देवाभाऊ खंबीर', भाजप आमदाराचा इशारा; शिवाजी पाटलांना मुश्रीफांनी मनावर घेतलचं नाही; म्हणाले, 'फारसं बोलणं...'

दूध उत्पादकांच्या हिताच्या निर्णयाचे मुश्रीफांकडून स्वागत

गोकुळच्या संचालक मंडळाने गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये, तर म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली आहे. या निर्णयाबद्दल मुश्रीफ यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनुदानात वाढ करण्यात आली असून, गाय खरेदीसाठीही मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Gokul government appointed directors controversy; Hasan Mushrif And Mukul Rohatgi
Hasan Mushrif : राजकारणामध्ये पुन्हा एक मोठा भूकंप? शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये जाणार? मुश्रीफांचे सूचक विधान, विलीनीकरणाबाबतही मोठा खुलासा

अध्यक्ष निवडीनंतर शांत झालेला वाद पुन्हा ऐरणीवर

चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून गोकुळमध्ये मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. अध्यक्ष निवडीनंतर हा वाद काहीसा शांत झाला होता. मात्र, आता न्यायालयीन लढाईसाठी सरकारी तिजोरीतून ८० लाख रुपये देण्याच्या आदेशामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती आवश्यक असल्याचे सांगत मुश्रीफ यांनी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तर दुसरीकडे रोहतगी यांच्या शुल्काबाबत आपल्याला माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.