
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने "लाडकी बहीण" योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे.
महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेविषयी माहिती दिली असून, सर्व लाभार्थींना पैसे मिळणार असल्याची ग्वाही दिली आहे.
बहिणींच्या खात्यात दोन दिवसात रक्कम जमा होईल, असे स्पष्ट करत सरकारने बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे.
Ladki Bahini Yojana News : राज्यातील महायुती सरकारने तब्बल 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले होते. त्यामुळे राज्यातील महिलांमध्ये नाराजी पसरली होती. पण सरकारने रक्षाबंधनाच्या आधीच नाराज लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी दिली आहे. लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी रक्षाबंधनाच्या आधीच सरकारने लाडक्या बहिणींच्या ओवाळणीचे पैसे (हप्ता) त्यांच्या बँक खात्यात बुधवारीच (ता.6) जमा करायला सुरूवात केली आहे. काही लाडक्या बहिणींच्या खात्यात या दोन दिवसात पैसै जमा होतील, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी (दि.7 ऑगस्ट) दिली आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या पंधराशे रुपये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मिळतील असेही म्हटलं आहे. त्या कोल्हापूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होत्या.
रक्षाबंधन 9 ऑगस्ट रोजी असून राज्यातील महायुती सरकारने राज्यातील तब्बल 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणींना दणका दिला. त्यांना अपात्र ठरवले. तसेच 14 हजारांहून अधिक पुरूषही योजनेचा लाभ घेत असल्याचेही उघड झाले आहे. यांचा देखील लाभ महिला आणि बाल विकास विभागाने थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे लाखो महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान या योजनेमुळे तिजोरीवर पडलेल्या भारामुळे रक्षाबंधनाच्याआधी जुलैचा हप्ता मिळणार की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती.
पण रक्षाबंधनाच्याआधी (9 ऑगस्ट) राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 6 ऑगस्टपासून हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येच्या आधी जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित केला जाणार आहे. त्या प्रमाणे पात्र महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
बोगस लाभार्थ्यांवर कारवाई होणार
बोगस लाभार्थ्यी महिला आणि 14 हजारांहून मिळालेले पुरूष लाभार्थ्यांबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तटकरे यांनी याची माहिती देताना, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने डाटा आमच्याकडे दिला आहे. त्याची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी पुढच्या 15 दिवसांचा कालावधी लागणार असून खरा आकडा पडताळणीनंतरच समोर येईल. तसेच या योजनेचा पुरूषांनी लाभ घेतल्याचे सिद्ध झाल्यास सरकार कडक कारवाई करणारच असाही त्यांनी इशारा दिला आहे.
प्र.1: लाडकी बहीण योजनेत किती रक्कम देण्यात आली आहे?
उ: या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी बहिणीच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.
प्र.2: रक्कम कधीपासून खात्यात जमा झाली आहे?
उ: ६ ऑगस्टपासून बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली असून दोन दिवसांत सर्वांना पैसे मिळतील.
प्र.3: ही योजना कोणासाठी आहे?
उ: ही योजना राज्यातील पात्र महिलांसाठी आहे, विशेषतः राखी सणानिमित्त बहिणींना आर्थिक सहाय्य करण्यासाठी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.