Gokul Dudh Sangh: गोकुळ निवडणुकीत ‘प्रेशर पॉलिटिक्स’? मुश्रीफांवर सतेज पाटलांचा हल्लाबोल; शक्तीप्रदर्शन करणे योग्य होतं का?

Satej Patil Statement on Hasan Mushrif: गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांच्या शक्तीप्रदर्शनावर सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली. गर्दी करून ठराव दाखल करणे योग्य होते का, असा सवाल करत प्रशासनावर दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Satej Patil and Hasan Mushrif
Satej Patil and Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्र ठराव दाखल केले. ठराव दाखल करताना गोंधळ निर्माण झाल्याने मंत्री मुश्रीफ हे अधिकाऱ्यांवर संतापले होते. मात्र त्यांचेच मित्र काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी अधिकाऱ्यांची पाठराखण करत मंत्री मुश्रीफ यांच्या प्रेशर पॉलिटिक्स वरच बोट ठेवले आहे. शिवाय गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोधात संदर्भात आपल्याशी कोणती चर्चा झालेली नाही. काँग्रेस म्हणून आम्ही 30 जून रोजी एकत्र ठराव दाखल करत आहोत. लढाई करण्याची तयारी आम्ही ठेवली आहे.

शक्ती प्रदर्शन करत एक गटाने ठराव दाखल करणे हे किती योग्य होते. ठराव धारकांनी स्वतंत्रपणे ठराव करून दाखल करणे असे ठरले होत. निर्माण झालेला गोंधळ हा गर्दीमुळेच झाला आहे. अधिकाऱ्यांवर किती दबाव टाकायचा हे महायुतीतील नेत्यांनी ठरवलं पाहिजे. ठराव दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिलेली आहे. त्यामुळे दररोज 100 ठराव दाखल केले तर नोंदणी आणि पोहोच देता येते.

गुरुवारी झालेल्या गर्दीमुळे कोणी ठराव दिला? त्यावर कोणाची सही आहे? ठराव धारकांनीच ठराव दिला याचा पत्ता लागणार नाही. दररोज जाऊन ठराव दिले तरच प्रशासनाला खातरजमा करता येईल. ज्यावेळी तारीख संपेल त्यावेळी दुबार ठराव किती आले. याचा आकडा समोर येईल. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेला ठराव मसुदा पुन्हा छापून ठराव दाखल करत आहेत. त्यामुळे दीडशे ते 200 दुबार ठराव येण्याची शक्यता आहे. हे प्रकरण पुन्हा कोर्टात जाण्याची शक्यता आहे. आधी भूमिका सतेज पाटील यांनी व्यक्त केली. कायदा आणि सुव्यवस्था मोडून प्रशासन अधिकाऱ्यांना काय मिळणार आहे, असे सतेज पाटील म्हणाले.

Satej Patil and Hasan Mushrif
Ketan Agarwal: सियाचे वडील ICUमध्ये; आई म्हणाली, ‘तिलाही लोहगडावरून ढकलून द्या’! चेतन चौधरीचा कर्मचारी बनणार माफीचा साक्षीदार?

ज्यांनी समतेचा संदेश दिला त्यांची आज जयंती आहे. त्या राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराने सरकारने पावले टाकावीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कायदा सुव्यवस्था, पाऊस उशिरा आल्याने आलेल्या समस्या यासाठी सरकारने शाहू महाराजांच्या विचारावर कारभार करावा, अशी अपेक्षा सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय संजय दिना पाटील असे बोलू शकत नाहीत. ते थेट बोलतात की पाच जणांचा खून झाला होता. राजकीय घटना घडल्यावर पत्रकार येतातच. तुम्हाला हवे असते तेव्हा पत्रकारांना भेटतात , असं राजकारणात होत नाही.पत्रकारांना संयमाने सामोरे जावे लागते. जी भाषा त्यांनी वापरली त्याला राज्य सरकारचा वरदहस्त आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे, असा संदेश द्यायचा असेल तर संजय पाटलांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली.

Satej Patil and Hasan Mushrif
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम! किचन कसं असावं?

महाविकास आघाडी आमदार बैठकी बाबत बोलताना, जे आमदार गैरहजर होते त्यांनी कारणे दिलेली आहेत. काहीजण बाहेरगावी होते. अचानक 23 जून ची तारीख 24 जूनला ठरल्याने काही आमदार येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढणे चुकीचे आहे. ठाकरे गटाचे आमदार जातील असे वाटत नाही. ज्यांना जायचं होतं ते 2022 लाच गेले आहेत. असेही आमदार पाटील म्हणाले.

Satej Patil and Hasan Mushrif
Teacher News: शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! तक्रार निवारण समितीलाच निर्णयाचे अधिकार; कोर्टात जाण्याची गरज नाही

एका तालुक्याचा विकास म्हणजे राज्याचा नव्हे

विकास सर्वांना दिसत आहे, फक्त माझे मित्र बंटी पाटील यांना विकास दिसत नाही अशा शब्दात गुरुवारी हसन मुश्रीफ यांनी चिमटा काढला होता. त्यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, ठेकेदारांचं अधिवेशन झालं. त्याची व्हिडिओ क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवतो. रस्त्यात किती खड्डे, पडले, कोणाचे बिल अडकले. एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास होत नाही.जिल्हा नियोजन चा निधी केवळ सत्ताधाऱ्यांना मिळतो, असा आरोप सतेज पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com