Gokul Election : सतेज पाटलांची कीव येते, हसन मुश्रीफांचा हल्लाबोल; 'गोकुळ'चे संस्थापक कोण? हे देखील सांगितले

Hasan Mushrif Vs Satej Patil : हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका करत म्हटले की, माझ्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी गोकुळला मल्टीस्टेट होऊ देणार नाही.
Satej Patil, Hasan Mushrif
Satej Patil, Hasan MushrifSarkarnama
Published on: 
Updated on: 

Hasan Mushrif News : 'एन टी सरनाईक यांनी पाहिला करवीर दूध संघ स्थापन केला. त्यानंतर गोकुळ दूध संघ स्थापन केला.आनंदराव पाटील चुयेकर हे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये बाजारपेठ मिळवून देण्याचे महत्वाचे काम केले. गोकुळची जी प्रगती झाली ती आनंदराव पाटील चुयेकर यांच्यामुळेच झाली. त्यावेळी मुंबईत मार्केट मिळालं, ही गोकुळसाठी सर्वात मोठी गोष्ट होती. मुंबई पुणे येथे मार्केट मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने दूध उत्पादकांचे कष्ट व मेहनत आहे, त्यामुळे याच श्रेय मी दूध उत्पादक कोल्हापूरच्या मातीला आणि पाण्याला. पण खऱ्या अर्थाने गोकुळ दूध संस्थापक हे एन.टी सरनाईकच होते', असे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

'मला माझे मित्र सतेज पाटील यांची कीव करावी वाटते. त्यांच्या लक्षात आले आहे की मतदार सभासदांपर्यंत आपल्याला पोचता येत नाही. ते लोकांच्यात आता गैरसमज पसरवत आहेत. मागील निवडणूक ही मल्टीस्टेटच्या विरोधातच आम्ही लढवली होती. माझ्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी गोकुळला मल्टीस्टेट होऊ देणार नाही.', असे देखील ते म्हणाले.

महायुतीअंतर्गत राजकारण?

गेल्या सहा महिन्यांपासून महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष झाला. दोन्ही बाजूंनी आपली भूमिका प्रामाणिक केली होती. ज्यांना संस्था अपात्र करायच्या होत्या त्यांनी प्रयत्न केले. ज्यांना संस्था पात्र करायच्या होता त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. पण आता महायुती मधील संघर्ष गंगार्पण केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आता आमच्यात फेविकॉल का जोड झालेला आहे, असे म्हणत महायुतीत अंतर्गत संघर्ष नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Satej Patil, Hasan Mushrif
Gokul election 2026 : राधानगरी, करवीर आणि पन्हाळा ठरणार गोकुळ विजयाचा टर्निंग पॉईंट; महायुतीला 'त्या' 1400 सभासदांची धास्ती

महायुतीचा अध्यक्ष होणार

पुढे बोलताना ते म्हणाले, विरोधकांनी समोर येऊन सांगावं की त्यांनी कधी शपता घेतलेल्या नाहीत. पराभवाच्या छायेत असल्यामुळे सतेज पाटील असे वक्तव्य करत आहेत. नवरात्र असल्याने अनेक महिला मतदारांना नवदुर्गेच दर्शन आयोजित केलेला आहे. सभासदांना देखील सहलीवर पाठवण्यात आला आहे.महायुतीच्या विजयाची शंभर टक्के खात्री आहे. मोठ्या मताधिक्याने महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील. विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच एकमताने अध्यक्षपदाचा निर्णय घेतील

Satej Patil, Hasan Mushrif
Gokul News: राधानगरीत मेव्हणे विरुद्ध पाहुणे! गोकुळमध्ये कार्यकर्ता, पत्नी-मुलांसाठी मंत्र्यांनी घेतलं मिटवून

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com