

दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिलेले मेहुणे पाहुणे आता गोकुळ दूध संघाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले आहेत. इतकेच नव्हे तर याच मतदारसंघात ज्याच्यात तिरंगी लढत झाली त्यांनी देखील हातात हात घालत प्रचाराला सुरवात केली आहे. तालुक्यातील या युतीमुळे मात्र कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. त्या उलट तिघांच्या यां युतीमुळे कोल्हापूरच्या राजकारणातील राजकारण वेगळे व सहकारतील राजकारण वेगळे, याच एक बोलके उदाहरणं म्हणता येईल.
गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने जुळले राजकीय सूर चांगलेच चर्चेत आले आहेत. गेल्या पाच वर्षांतील राजकीय मतभेदांमुळे दुरावलेले ए. वाय. पाटील आणि के. पी. पाटील हे मेहुणे-पाहुणे यांच्यात विधानसभा निवडणुकीत टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. पण गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले. अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील ठरावधारकांच्या मेळाव्यात व्यासपीठावर दोघेही मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले.
आमदारकीपासून बिद्री साखर कारखाना, बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळपर्यंत अनेक सत्ताकेंद्रांमध्ये एकत्र काम केलेल्या या दोन्ही नेत्यांमधील जवळीक पुन्हा दिसल्याने राधानगरीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. परिणामी केवळ गोकुळमध्येच एकत्र दिसणार की आगामी काळात सुद्धा एकत्र राहणार याबाबत अधिक स्पष्टता नाही. कारण ए. वाय. पाटील हे लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे आहेत. पण मंत्री मुश्रीफांच्या जवळचे आहेत. तर के. पी पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. आगामी काळात जिल्हा बँकेची निवडणूक आहे. त्यामुळे पुढील विधानसभा लागेपर्यंत दोघांचे हातात हात असतील, असेच चित्र दिसते.
तर दुसरीकडे राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभा राहिलेले मंत्री प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यां तिघांमध्ये लढत झाली होती. आबिटकर गटाचे कट्टर राजकीय विरोधक के. पी. पाटील, तर ए. वाय. पाटील यांचे विरोधक म्हणून त्यावेकी के. पी. पाटील यांच्याकडे पाहिले जात होतं. मात्र, सध्या तिघेही एकाच व्यासपीठावर आहेत. आबिटकर हे कार्यकर्ते मदन देसाई, तर के. पी. पाटील हे चिरंजीव रणजितसिंह पाटील, तर ए. वाय. पाटील हे पत्नी अर्चना पाटील हे गोकुळमध्ये महायुतीच्या पॅनेलमध्ये एकत्र आले आहेत. त्यामुळे राधानगरीतील भविष्यातील राजकीय गणिते आणखी वेगळी ठरवून राजकीय विरोधकांमध्ये भर पडणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.