Gokul Election : गोकुळच्या बैठकीत चंद्रकांत पाटलांनी मुश्रीफांना सुनावलं; म्हणाले, "कोरे आणि तुम्हीच ठरवा..."

Gokul Election Politics Dispute : ठरावदारांच्या ओळख परेडवरून रविवारी राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांत भाजपच्या कार्यालयातच मंत्री पाटील यांच्यासमोर राडा झाला. त्यानंतर तातडीने मंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांना बोलावून घेतले. झालेल्या प्रकारावरून पाटील यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
Gokul Election | Mahayuti Dispute | Chandrakant Patil
Gokul Election | Mahayuti Dispute | Chandrakant PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News, 28 Sep : 'गोकुळ'च्या निवडणुकीसाठी महायुतीचे सर्व काही निर्णय आणि कोणाचे किती ठराव तुम्ही आणि 'जनसुराज्य'चे आमदार डॉ. विनय कोरे हेच ठरवणार असाल, तर तसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगा' मग हा खेळखंडोबा कशाला करताय', अशा शब्दात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांना सुनावल्याचे समजते.

शिवाय आमदार अमल महाडिक यांना बाकीचे नेते राजकारण करणार असतील तर अमल 25 जागांची तयारी करा. आम्हाला युती करायची नाही असा सज्जड इशारा भाजप कार्यालयातील बंद दाराआड झालेल्या बैठकीत मंत्री पाटील यांनी दिला.

ठरावदारांच्या ओळख परेडवरून रविवारी राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांत भाजपच्या कार्यालयातच मंत्री पाटील यांच्यासमोर राडा झाला. त्यानंतर तातडीने मंत्री पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना बोलावून घेतले. कार्यकर्त्यांतील वाद शांत झाल्यानंतर मंत्री पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, के. पी. पाटील यांच्यात बंद दाराआड बैठक झाली.

Gokul Election | Mahayuti Dispute | Chandrakant Patil
Ashok Chavan : '24 तासही झाले नाही तोच बोंबाबोंब सुरू', भाजपच्या बड्या नेत्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

झालेल्या प्रकारावरून मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर व भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. "महायुती म्हणून सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचे ठरले आहे. पण, तुम्ही आणि डॉ. कोरे दोघेच महायुतीचे निर्णय घेणार असाल, तर तसे मुख्यमंत्र्यांना सांगा.

Gokul Election | Mahayuti Dispute | Chandrakant Patil
MLC Election : एकनाथ शिंदे, मुश्रीफांवर पुन्हा नवं धर्मसंकट? पुणे शिक्षक, पदवीधरमध्ये बंडखोरीचे सावट; कारभाऱ्यांनी शड्डू ठोकलाच

हा खेळखंडोबा कशाला मांडलाय," अशा शब्दात पाटील यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मंत्री पाटील यांच्या या इशाऱ्याने बैठकीत खळबळ उडाली. यातून पाटील यांनी मुश्रीफ व कोरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हे सर्व नेते महायुतीच्या बैठकीसाठी हॉटेलकडे निघून गेले. तिथे पुन्हा चर्चा करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com