Hasan Mushrif-Shoumika Mahadik
Hasan Mushrif-Shoumika MahadikSarkarnama

Shaumika Mahadik : शौमिका महाडिकांनी 'गोकुळ'साठी रणशिंग फुंकले; म्हणाल्या, 'निवडणुकीला हलक्यात घेऊ नका...'

Gokul Election Shaumika Mahadik : त्या दोन ते तीन दिवसात गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
Published on

Shaumika Mahadik News : मागील पंचवार्षिक निवडणुकीत गोकुळ दूध संघामध्ये सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता गोकुळ दूध संघावर आली. तर तत्कालीन सत्ताधाऱ्यांचे चार संचालक निवडून आले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमुळे यातील काही संचालकांनी पाटील मुश्रीफ गटाशी जुळवून घेतले. मात्र गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी आमदार सतेज पाटील-मंत्री हसन मुश्रीफ गटाला विविध मुद्द्यावरून घाम फोडला.

यंदाची निवडणूक ही महायुती म्हणून लढत असताना मंत्री मुश्रीफ हे आता महाडिक गटासोबत असणार आहेत. तर, महाविकास आघाडी म्हणून आमदार सतेज पाटील हे विरोधात असणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

आज कोल्हापूर भाजप कार्यालयात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य आणि ठराव धारक यांची बैठक पार पडली. शौमिका महाडिक म्हणाल्या, महाडिक कुटुंबावर आजपर्यंत तुमचं प्रेम राहिले आहे. आता भाजप सोबत आपण सर्व आहोत. मागील निवडणुकीत काही चुका झाल्या. पण त्या चुका या निवडणुकीत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

'तुमच्याकडून काही सूचना हव्या आहेत. गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवण्याचा काम केलं आहे. या निवडणुकीला आपण महायुती म्हणून सामोरे जातं आहोत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र या निवडणुकीला सामोरे जातं आहोत.', असं देखील त्यांनी जाहीर केलं.

Hasan Mushrif-Shoumika Mahadik
Pandharpur Politic's : मोठी बातमी : पंढरपुरात परिचारक-अभिजीत पाटील एकत्र येणार; वरिष्ठ पातळीवरून हलली सूत्रे, सत्तावाटपही ठरलं!

'जागावाटपाचा निर्णय होत असताना ज्याकडे ठराव जास्त असतील तसा निर्णय होईल. पण सर्वात जास्त ठराव आपल्याकडे येईल यासाठी प्रयत्न करा. जेवढे ठराव येतील तेवढी जागा घेण्यास आपल्याला मदत होईल. गोकुळच्या निवडणुकीला हलक्यात घेऊ नका.', असे सांगत त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

जागावाटपाचे सुत्र काय?

जागावाटप सूत्र काय होईल माहिती नाही. पक्ष पातळीवर निर्णय होईल न होईल, किंवा ठराव ज्याच्याकडे अधिक त्याला उमेदवारी अधिक असे सूत्र ठरले तर कुठे कमी पडायचे नाही,असेही महाडिक म्हणाल्या.

Hasan Mushrif-Shoumika Mahadik
Maharashtra budget 2026 : सर्वात मोठी बातमी! अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुख्यमंत्री फडणवीसांची अर्थसंकल्पात घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com