Gokul Milk : 'गोकुळ'मध्ये हसन मुश्रीफांना नडणाऱ्या प्रकाश बेलवाडे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांदेखत घडला प्रकार

Gokul Milk : गोकुळ दूध संघावरील चौकशीची मागणी करणारे प्रकाश बेलवाडे यांच्यावर कागल येथे हल्ल्याचा प्रयत्न झाला. या घटनेत वैभव यादव जखमी झाले आहेत.
Gokul Milk critic Prakash Belawade after alleged attack attempt near Kagal checkpost amid rising tensions over cooperative milk union controversy.
Gokul Milk critic Prakash Belawade after alleged attack attempt near Kagal checkpost amid rising tensions over cooperative milk union controversy.Sarkarnama
Published on
Updated on

Gokul Milk : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळशी संलग्न १२00 हून अधिक प्राथमिक दूध संस्थांची चौकशी करावी अशी मागणी करणारे, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सातत्याने टीका करणारे गर्जना संघटनेचे प्रमुख प्रकाश बेलवाडे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. कागल चेकपोस्ट नाका येथे हा प्रकार घडला असून या घटनेत वैभव यादव हेही जखमी झाले आहेत.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चप्पल उगारत बेलवाडे यांच्या दिशेने धावताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी पोलीसही उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

प्रकाश बेलवाडे यांनी गेल्या काही दिवसांपासून गोकुळ दूध संघाच्या कारभारावर जोरदार टीका सुरू केली होती. विशेषतः गोकुळशी संलग्न सुमारे १२०० प्राथमिक दूध संस्थांच्या अवसायन प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून सध्या या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Gokul Milk critic Prakash Belawade after alleged attack attempt near Kagal checkpost amid rising tensions over cooperative milk union controversy.
Gokul Milk Union election: ‘गोकुळ’च्या निकालावरून सतेज पाटील कडाडले; म्हणाले, 'ताबा घेण्याचा अदृश्य शक्तीचा डाव सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडला'

यासोबतच गोकुळवर प्रशासक नेमण्याची मागणीही बेलवाडे सातत्याने करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि गोकुळच्या संचालक मंडळावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आता त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Gokul Milk critic Prakash Belawade after alleged attack attempt near Kagal checkpost amid rising tensions over cooperative milk union controversy.
Gokul Election : 'गोकुळ'ची निवडणूक 90 दिवसात होणार की नाही? सत्ताधारी संचालकांचा डाव सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडला

१२०० संस्थांच्या चौकशीची मागणी :

गोकुळ दूध संघातील १२०० सभासदांच्या समावेशासंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे याचिका दाखल आहे. प्रकाश बेलवाडे यांनीच ही याचिका दाखल केली आहे असून यावर सुनावणी सुरु आहे. या बाराशे सभासदांना पात्र करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या आणि तत्कालीन दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांनी काढलेल्या आदेशाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com