Gokul Milk Union election: ‘गोकुळ’च्या निकालावरून सतेज पाटील कडाडले; म्हणाले, 'ताबा घेण्याचा अदृश्य शक्तीचा डाव सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडला'

Kolhapur politics News : प्रशासकांच्या माध्यमातून अदृश्य शक्तीकडून ‘गोकुळ’वर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे हाणून पडल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशावर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसांत घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे दूध उत्पादकांतर्फे स्वागत करतो. प्रशासकांच्या माध्यमातून अदृश्य शक्तीकडून ‘गोकुळ’वर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे हाणून पडल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

आमदार पाटील म्हणाले, ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी सुमारे 1200 दूध संस्थांच्या पात्रतेचा निर्णय लवकर व्हावा. त्यांना मतदानाचा हक्क देत तातडीने निवडणूक घ्यावी, अशी सातत्याने मागणी केली होती. दूध संस्थांच्या मतदानाचा हक्क अबाधित राहणे गरजेचे आहे. घाईघाईने सरकारने कायदा करून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रशासक नेमण्याची कारवाई केली. त्यासोबतच साताऱ्यातून कोल्हापुरात येऊन सायंकाळी कार्यभार स्वीकारण्याची प्रक्रिया संशयास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दिलासा मिळाला असून, आता निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.

Satej Patil
Gokul Dudh Sangh election update : गोकुळमधील 'अदृश्य शक्ती'ला सर्वोच्च दणका; निवडणूक 3 महिन्यात घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश!

‘गोकुळ’ची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार विनय कोरे (Vinay Kore) यांनी काही काळ प्राथमिक चर्चा केली होती. मात्र, निवडणूक लांबणीवर पडल्याने तो प्रस्ताव थांबला असून, सध्या तरी कोणताही ठोस प्रस्ताव समोर आलेला नाही. प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल, असेही सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले.

Satej Patil
Gokul Politics : अखेर 'गोकुळ'वर प्रशासक! CM फडणवीसांनी 5 जणांच्या टीमवर सोपवला कारभार : मुश्रीफ अन् संचालक मंडळाला धक्का

राज्य सरकारने प्रशासक नेमल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सरकारला चपराक आहे. निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत आम्ही तयार असून, सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण नसावे, अशी भूमिका आहे. महायुतीतील अंतर्गत वादात गोकुळ भरडला जाऊ नये. न्यायालयीन प्रक्रियेनुसार 45 दिवसांची ठराव प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. पावसाळ्यामुळे मतदान पुढे ढकलले जाऊ शकते; मात्र किमान प्रक्रिया सुरू होणे गरजेचे आहे, असेही सतेज पाटील म्हणाले.

Satej Patil
Gokul Politics: महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? काँग्रेसच्या सतेज पाटलांनी 'गोकुळ'चं राजकारण एका ओळीत सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com