Gokul News : गोकुळच्या दूध खरेदी-विक्री दरवाढीचा निर्णय लांबणीवर: पहिल्या बैठकीत तपासणार प्रशासक काळातील हिशेब

Kolhapur Politics: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार राजेश पाटील यांची निवड झाल्यानंतर शनिवारी (ता. १४) नव्या संचालक मंडळाची पहिली बैठक होणार आहे. गोकुळ शिरगाव येथील संघाच्या मुख्य कार्यालयात ही बैठक पार पडणार असून, प्रशासक काळातील कामकाजाचा आढावा हा बैठकीतील प्रमुख विषय असणार आहे.
Gokul Election News
Gokul Election NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या नव्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांसह सभासदांचे लक्ष लागले आहे. मात्र, या बैठकीत दूध दरवाढीचा कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. नव्या संचालक मंडळाकडून सर्वप्रथम प्रशासकीय राजवटीतील कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. या काळात संघाला किती नफा झाला, किती तोटा झाला, कोणते निर्णय घेण्यात आले, यावर बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना अपेक्षित असलेली दरवाढ तूर्तास लांबणीवर पडणार आहे.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार राजेश पाटील यांची निवड झाल्यानंतर शनिवारी (ता. १४) नव्या संचालक मंडळाची पहिली बैठक होणार आहे. गोकुळ शिरगाव येथील संघाच्या मुख्य कार्यालयात ही बैठक पार पडणार असून, प्रशासक काळातील कामकाजाचा आढावा हा बैठकीतील प्रमुख विषय असणार आहे. या बैठकीला निवडून आलेले २५ संचालक आणि शासननियुक्त चार संचालक उपस्थित राहणार आहेत.

आधी प्रशासक काळातील कारभाराचा आढावा

गोकुळमध्ये प्रशासकीय राजवट संपल्यानंतर नव्या संचालक मंडळासमोर संघाचा कारभार पुन्हा रुळावर आणण्याचे आव्हान आहे. त्यामुळे प्रशासकांच्या काळात झालेल्या आर्थिक व्यवहारांचा, निर्णयांचा आणि संघाच्या नफा-तोट्याचा आढावा घेतला जाणार आहे. या काळात संघाच्या कामकाजात काय घडले, कोणत्या निर्णयांचा दूध उत्पादकांना फायदा किंवा तोटा झाला, यावर संचालकांमध्ये विचारमंथन होणार आहे.

सध्या दूध दरवाढीचा निर्णय घेण्याऐवजी संघाची आर्थिक स्थिती आणि प्रशासकीय कामकाज समजून घेण्यावर नव्या नेतृत्वाचा भर असणार आहे. त्यामुळे पहिल्याच बैठकीत दरवाढीची अपेक्षा ठेवणाऱ्या दूध उत्पादकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Gokul Election News
Bajrang Sonawane : आमच्या गावात गुडघ्या इतके खड्डे, विकासकामे कधी करणार? तरुणाने थेट खासदार बजरंग सोनवणेंना जाब विचारला!

मुंबई-पुण्यातील दूध वितरकांशीही चर्चा

दूध दरवाढीबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मुंबई आणि पुण्यातील गोकुळच्या सर्व वितरकांची बैठकही घेतली जाणार आहे. बाजारपेठेतील परिस्थिती, विक्री, वितरण आणि दरवाढीचा ग्राहकांवर होणारा परिणाम याबाबत वितरकांशी चर्चा केली जाणार आहे.

याशिवाय राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर या तिन्ही नेत्यांशीही दरवाढीच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. या सर्व चर्चांनंतरच दूध दरवाढीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

Gokul Election News
Solapur Dcc Bank : कोर्टाने वाढविले मोहिते पाटील, माने, शिंदे, आवताडे, जगताप, हसापुरेंचे टेन्शन; दोन तास पाडला कायद्याचा किस, ‘या’ तारखेला निकाल...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.