Gokul News: गोकुळ दूध संघाच्या 1200 सभासदांबाबत मोठी बातमी, न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रक्रिया लांबणीवर

Gokul Politics: सध्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी गोकुळ दूधसंघाबाबतची अंतिम सभासद यादी जाहीर होणार होती. न्यायालयाच्या या आदेशामुळे 1200 सभासदांबाबत शंका उपस्थित होत आहे.
Gokul Dairy
Gokul DairySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक दूध संघ (गोकुळ) मधील 1200 सभासदांच्या पात्रेबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या पत्रकाविरोधात शनिवारी (ता.7 मार्च) मुंबई उच्चं न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने महत्वपूर्ण आदेश दिले आहे. मात्र, अंतिम निर्णय झालेला नाही.

पुढील सुनावणी 10 मार्चला होणार आहे. सोमवारी प्रसिद्ध होणारी अंतिम ठराव मतदार यादी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे निश्चित होणारी ठरावधाकारांची अंतिम संख्या मंगळवारी होणाऱ्या पुढील सुनावणीनंतर निश्चित होणार आहे. त्यावरच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची पुढील दिशा अवलंबून आहे.

गोकुळ दूधसंघात वाढवलेले 1200 सभासद रद्द करावेत अशी मागणी आजरा तालुक्यातील वडकशिवालेमधील महादेव सहकारी दूध संस्ठेचे प्रकाश बेलावडे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये गोकुळ दूध संघ, महाराष्ट्र शासन यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी शनिवारी पार पडली. यावेळी याचिकाकर्ते यांचे वकील सतीश तळेकर यांनी बाजू मांडली.

गोकुळ दूधसंघात सहकारच्या नियमाच्या अधीन न राहता सभासद वाढवण्याचा प्रकार घडला आहे. एखादी संस्था सलग 242 दिवस दूध नियमित घालत असेल तर ती संस्था पात्र असू शकते. मात्र अशा अनेक संस्था आहेत. ज्यांनी दूध गोकुळकडे घातलेले नाही. अनेक गावांत चार पाच दूध संस्था आहेत. त्या संदर्भात तत्कालीन अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रार झाल्यानंतर 1200 संस्था अवसयानात काढल्या होत्या.

Gokul Dairy
Government Scheme: मुख्यमंत्र्यांची विधानसभेतच सर्वात मोठी घोषणा; तिसरं अपत्य जन्माला घातलं, तर मोफत शिक्षण अन् 85000 मिळणार

त्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः पत्रव्यवहार करून तत्कालीन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मुंडे यांच्या कारवाईला स्थगिती आणली. मात्र सहकारच्या नियमानुसार याला दुग्धनिबंधक अधिकारीच स्थगिती देऊ शकतात. शिवाय ज्या संस्था अवसयनात जाणार आहे. त्यां संस्थानी कोणतेही मागणी केली नाही. संस्थानी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे सुद्धा मागणी केली नाही. केवळ मंत्री मुश्रीफ यांनी पत्राद्वारे ही मागणी विखे पाटील यांच्याकडे केली. मात्र त्यामुळे ही स्थगिती बेकायदेशीर असल्याची बाजू ऍड. तळेकर यांनी मांडली.

त्यावर न्यायमूर्ती देशमुख यांनी सचिन देशमुख यांच्यासमोर युक्तिवाद झाला. यावेळी सरकारी वकील विकास माळी म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागून घेतला. त्यावर न्यायमूर्ती देशमुख यांच्याकडून पुढील सुनावणी होण्यापूर्वी कोणतीही प्रक्रिया न करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

Gokul Dairy
Shiv Sena UBT action : उद्धव ठाकरेंचा दणका! तीन नगरसेवकांना 'फायनल' नोटीस; 48 तासांचा अल्टिमेटम संपताच करणार मोठी कारवाई?

सध्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी गोकुळ दूधसंघाबाबतची अंतिम सभासद यादी जाहीर होणार होती. न्यायालयाच्या या आदेशामुळे 1200 सभासदांबाबत शंका उपस्थित होत आहे.

गोकुळकडून दिलेल्या सर्व संस्थांच्या यादीची छाननी पूर्ण झाली असून सोमवारी त्यावर शिक्कामोर्तब केला जाणार होता. मात्र न्यायालयाने दिलेल्या पुढील सुनावणी म्हणजेच 10 मार्च नंतर याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती दुग्ध निबंधक प्रदीप मालेगावे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com