Shiv Sena UBT action : उद्धव ठाकरेंचा दणका! तीन नगरसेवकांना 'फायनल' नोटीस; 48 तासांचा अल्टिमेटम संपताच करणार मोठी कारवाई?

Kalyan Dombivli municipal politics News : नगरसेवकांचे सदस्य पद रद्द करण्याची प्रक्रिया कोकण विभागीय आयुक्तांना करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा खुलासा येत्या 48 तासात देण्यात यावा, असे जिल्हा प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.
Uddhav-Thackeray
Uddhav-ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील तीन बंडखोर नगरसेवका विरोधात उद्धव ठाकरेंनी मोठी कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. अपात्रतेसाठी त्या तीन नगरसेवकांना 48 तासांची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या नोटिशीला उत्तर न दिल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नॉट रिचेबल असलेले तीन नगरसेवक कोणत्याही गटात सहभागी न झाल्याने त्यांना अंतिम इशारा देण्यात आला आहे. त्यासोबतच नगरसेवकांचे सदस्य पद रद्द करण्याची प्रक्रिया कोकण विभागीय आयुक्तांना करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा खुलासा येत्या 48 तासात देण्यात यावा, असे जिल्हा प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत उद्धव सेनेचे 11 नगरसेवक निवडून आले होते. निकाल लागताच उद्धव सेनेचे (Shivsena) नगरसेवक राहूल कोट, मधूर म्हात्रे, किर्ती ढोणे, स्वप्नीनी केणे हे चार नगरसेवक नॉट रिचेबल झाले. महापौर पदाच्या निवडणूकीत किर्ती ढोणे हजर झाल्या. मात्र कोट, म्हात्रे, केणे हे तीन नगरसेवक गैरहजर राहिले. पक्षाने त्यांचे गट स्थापन केले. ही गट स्थापन करण्याची प्रक्रिया कोकण विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. मात्र, कोकण विभागीय आयुक्तांनी उद्धव सेनेचे निवडून आलेले 11 नगरसेवक असे नमूद केले आहे.

Uddhav-Thackeray
Shivsena Rajya Sabha: शिंदेंकडून वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी; इच्छुक नेता भडकला; म्हणाले...

कोकण विभागीय आयुक्तांनी11 नगरसेवकांची सदस्य नोंदणी केली आहे. त्यामुळे जे 3 नगरसेवक कोणत्याही गटात सहभागी झाले नसले तरी ते उद्धव सेनेच्या गटात असल्याचे कोकण विभागीय आयुक्तांनी स्पष्ट करावे. मात्र, कोकण विभागीय आयुक्तांनी त्यावर उत्तर देताना ते कोणत्याही गटात सहभागी नाहीत हे स्पष्ट केले. मात्र, ते उद्धव सेनेच्या गटात गणले जातील, असे स्पष्ट केलेले नाही.

Uddhav-Thackeray
Congress News : काँग्रेसचा गटनेताच फुटला!जालना महापालिकेत नाचक्की; एक स्वीकृत सदस्य करण्याची संधीही हुकली!

त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी नगरसेवकांना अंतिम नोटिस बजावली आहे. त्यांनी गट स्थापनेच्या प्रक्रियेत सहकार्य केले नाही. ही कृती पक्षाच्या विरोधात आहे. या तीन सदस्यांनी स्वइच्छेने पक्षाचा त्याग केला असे मानले जाऊ शकते. पक्षाने या बाबत वारंवार विचारणा केली. तसेच खुलासा मागितला. त्याचा खुलासा 3 नगरसेवकांनी दिलेला नाही.

Uddhav-Thackeray
BJP Politics: भाजपमध्ये बंडखोरांच्या परतीचा मेळा; आयाराम नगरसेवकांच्या राजकारणात खळबळ

पक्षाकडून ही अंतिम नोटिस असल्याने 48 तासात खुलासा केला नाही तर कोकण विभागीय आयुक्तांकडून नगरसेवक अपात्रेतीची कारवाई केली जाईल असा या अंतिम नोटिसद्वारे इशारा देण्यात आला आहे. तीन बंडखोर नगरसेवकांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने अपात्रतेसाठी अंतिम इशारा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या काळात काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav-Thackeray
Jayant Patil on NCP Merger : 'राष्ट्रवादीचे विलीनीकरण आता सुतरामही शक्यता नाही,...', जयंत पाटलांनी कंडका पाडला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com