Gokul Politics : गोकुळचा रंगा-बिल्ला बोका; डिजिटल प्रचारातून होतंय संचालकांचं पितळ उघडं

Gokul Milk Union election : समाज माध्यमातून सुरू असलेल्या या आरोग्य प्रत्यारोपामुळे सर्वांचेच पितळ उघड पडत आहे. गेल्या 35 वर्षांपासून सुरू असलेला गोकुळमधील कारभार आता दूध उत्पादकांसमोर आणला जात आहे. शिवाय ज्या संचालकांनी बंड करून मागील पाच वर्षात सहकार्य केलं त्याच नेत्यांच्या विरोधात आता जाहीरपणे न बोलता समाज माध्यमातून चारित्र्यहनन केले जात आहे.
Gokul Milk Union election
Gokul Milk Union electionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 18 Sep : गोकुळ दूध संघाची निवडणूक कोल्हापुरात गाजत असताना आता सोशल मीडियात ही प्रचाराला जोर आला आहे. महायुतीमधील अंतर्गत घटक पक्षांमध्ये सुरू असलेला संघर्ष ते महायुती महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेला आरोप प्रत्यारोपांचा खेळ चांगलाच रंगात आला आहे.

मात्र, सोशल मीडियात देखील आरोप प्रत्यारोपांनीं टोकाची पातळी गाठली आहे. यातून गोकुळमधील दोन प्रमुख नेत्यांची गैरकारभार समोर आणणारी मालिका सुरू करण्यात आली आहे. 35 वर्ष सोबत असणारे आणि मागील पाच वर्षात बंड करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळणाऱ्या सर्वच घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे दोन कट्टर राजकीय विरोधकांकडून या प्रमुख दोन नेत्यांवरच समाज माध्यमातून टीका केली जात आहे.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत विरोधकांचं पितळ उघडं पाडण्यासाठी जे जाहीर बोलता येत नाही ते समाज माध्यमातून परफेक्ट करता येतं. याची अनेक उदाहरण समोर आहेत. सध्या गोकुळ दूध संघाची निवडणूक सुरू आहे. या निवडणूक प्रक्रियेत ठराव धारकांना महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक गटाच्या ठराव धारकाला प्रत्येकाची गरज आहे. मात्र जाहीरपणे त्यांच्यावर बोलून विरोध ओढावून घेण्यापेक्षा समाज माध्यमातुन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर अज्ञातांकडून जोरदार टीका होत आहे.

Gokul Milk Union election
Pune Teacher Constituency Election : शिवसेनेच्या मंगेश चिवटेंचा राजकीय बळी देण्याची तयारी : पदवीधर-शिक्षकसाठी मंत्री मुश्रीफांची भाजपला नवी ऑफर

समाज माध्यमातून सुरू असलेल्या या आरोग्य प्रत्यारोपामुळे सर्वांचेच पितळ उघड पडत आहे. गेल्या 35 वर्षांपासून सुरू असलेला गोकुळमधील कारभार आता दूध उत्पादकांसमोर आणला जात आहे. शिवाय ज्या संचालकांनी बंड करून मागील पाच वर्षात सहकार्य केलं त्याच नेत्यांच्या विरोधात आता जाहीरपणे न बोलता समाज माध्यमातून चारित्र्यहनन केले जात आहे. समाज माध्यमातील एका इंस्टाग्राम पेजवर थेट रंगा बिल्ला ही मालिका सुरू करण्यात आली आहे.

Gokul Milk Union election
Gokul Election : "मुश्रीफ हतबल, महायुतीत असूनही कोर्टात का जावं लागलं...." सतेज पाटलांनी थेट मुद्द्यावर बोट ठेवलं

दर बुधवारी याचा एक भाग प्रकाशित केला जात आहे. दोन माजी अध्यक्षांनी गोकुळमध्ये गेल्या 35 वर्षात काय पराक्रम केले याचा लेखाजोखा दूध उत्पादकांसमोर मांडला जात आहे. तर मागील निवडणुकीत जे दोन प्रमुख नेते एकत्र होते त्यांच्या कार्यकाळात काय काय झालं? कोणत्या प्रकरणात गैरकारभार झाला? याची वस्तुस्थिती या समाज माध्यमातून पुढे आणले जात आहे.

महायुती सरकारच्या काळात गोकुळची अवस्था काय आहे? दूध उत्पादक आणि संस्थांना कोणता त्रास सहन करावा लागत आहे? याची वस्तुस्थिती मांडणारे इमेज देखील व्हायरल होत आहेत. समाज माध्यमात असणाऱ्या गोकुळचा बोका, गोकुळ घडामोडी, मुलुख महाराष्ट्र, महाडिक प्रेमी, सतेज व्हॉइस, फुकटच राजकारण, यासारख्या समाज माध्यमांवरील पेजवरून गोकुळच्या प्रत्येक राजकीय कुरघोडीवर भाष्य करून अनेकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com