Gokul Election : सगळं ठरलं फक्त घोषणा बाकी; गोकुळमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ : जनसुराज्यला लॉटरी लागणार?

Gokul Mahayuti Seat Sharing : जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागावाटपासंदर्भातील निर्णय महायुतीच्या नेत्यांना कळवणार आहेत. तत्पूर्वी जागावाटपामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेच मोठा भाऊ ठरणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
Gokul Election
Gokul ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News, 01 Oct : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठका आणि त्यामध्ये निर्णय न झाल्यामुळे मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं होते. येत्या एक किंवा दोन दिवसात मुख्यमंत्री जागावाटपासंदर्भात घोषणा करणार आहेत.

जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागावाटपासंदर्भातील निर्णय महायुतीच्या नेत्यांना कळवणार आहेत. तत्पूर्वी जागावाटपामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेच मोठा भाऊ ठरणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. तर जनसुराज्य शक्तीला देखील लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितितील महायुतीचे बैठक निष्फळ ठरली असे सांगितले जात असले तरी अनेक मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून 10 शिवसेना आणि भाजपकडून प्रत्येकी 8, तर जनसुराज्यकडून 3 जागांची मागणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीतील सर्व पक्षीय नेत्यांची बाजू ऐकून घेतली. दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री हे गोकुळ दूध संघाच्या जागावाटपाचा निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Gokul Election
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्याकांड प्रकरणात मध्यरात्री मोठी घडामोड : FIR मध्ये मिनाक्षी शिंदे अन् राजेंद्र शिंदेंचं नाव

त्यानुसार गोकुळ दूध संघामधील महायुतीचे जागावाटप हे अंतिम टप्यात आले आहे. त्यामुळे महायुतीच्या संभाव्य जागा वाटपामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहा महिन्याच्या संघर्षाचा विजय होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीमध्ये मोठा भाऊ ठरणार असून राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ तर आमदार यड्रावकर यांच्या गटाला एक अशा मिळून दहा जागा मिळण्याची शक्यता आहे.

Gokul Election
Pune DCC Bank : पुणे जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट; अशोक पवारांना घेरण्यासाठी माऊली कटकेंची तगडी फिल्डिंग

तर पाठोपाठ भाजपला सात जागा आणि स्वीकृत एक अशा आठ, तर शिवसेनेला सहा जागा आणि एक स्वीकृत मिळण्याची शक्यता आहे. तरी यंदा जनसुराज्य शक्तीला लॉटरी लागण्याची शक्यता असून त्यांना दोन जागा आणि एक स्वीकृत अशा तीन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com