

गोकुळ दूध संघाच्या सत्तेसाठी नेते आणि कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष वाढत आहे.
कर्मचाऱ्यांनाही संचालक होण्याची संधी दिल्याने स्पर्धा वाढणार आहे.
या निर्णयासाठी राज्य सरकारकडे पुढील पाठपुरावा सुरू राहणार आहे.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या सत्तेसाठी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. संघावर सत्ता येण्यासाठी सर्वच नेत्यांनी आपले देव पाण्यात घालून सर्वोत्तोपरी तयारी ठेवली आहे. जिल्ह्यातील नेत्यांमध्येच सत्ता संघर्ष सुरू असताना आता गोकुळमधील कर्मचाऱ्यांमध्ये देखील सत्तासंघर्षाची चिन्हे निर्माण झाली आहेत. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचे युनियन मधील दोन कर्मचाऱ्यांना संचालक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता संघावर संचालक होण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्येच चढाओढ होण्याची शक्यता आहे. केवळ संचालक मंडळाने परवानगी दिली असली तरी राज्य सरकारकडे या निर्णयासाठी पाठपुरावा सुरू राहणार आहे.
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळात आता युनियनचे दोन सदस्य कर्मचारी असणार आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा कर्मचाऱ्यांना संचालक मंडळावर संधी दिली आहे. गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीतील यावर शिक्कामोर्तब झाले. अध्यक्षस्थानी नविद मुश्रीफ होते.
संचालक मंडळावर दोन कर्मचाऱ्यांची संचालक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी काही वर्षे सुरू होती. मागील सर्वसाधारण सभेत ही मागणी मान्य करण्याचे आश्वासन संचालक मंडळाने दिले होते. त्यानुसार हा विषय आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी होता. त्याला संचालकांनी मान्यता दिली.
युनियनमधील दोन कर्मचाऱ्यांना संचालक मंडळावर संधी मिळणार असल्यामुळे युनियनमध्ये याबाबत वाद, राजकरण आणि दबावतंत्र सुरू झाले आहे. याबाबत पत्रकबाजी सुरू झाली आहे. संघर्षांची स्थिती निर्माण होणाची चिन्हे आहेत.
या मान्यतेचा प्रस्ताव आता राज्य शासनाकडे पाठविला जाईल. त्यांच्या मान्यतेनंतर प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होईल. बैठकीत इतर नियमित विषयांव्यतिरिक्त हा एकच विषय कर्मचाऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा होता. त्याला आता निवडणुकीच्या तोंडावर मान्यता दिली आहे.
माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्यासह संचालक उपस्थित होते. दरम्यान, या महिनाअखेरीस संचालक मंडळाची आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे. याचपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 'गोकुळ' संदर्भातील सुनावण्या आहेत. यातील निर्णयावर पुढील स्थिती अवलंबून आहे.
1. गोकुळ दूध संघात काय नवीन घडामोड झाली आहे?
कर्मचाऱ्यांना संचालक होण्याची संधी दिल्याने संघर्ष वाढला आहे.
2. संघर्ष कोणामध्ये आहे?
नेते आणि कर्मचाऱ्यांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे.
3. हा निर्णय कोणी घेतला आहे?
संचालक मंडळाने प्राथमिक परवानगी दिली आहे.
4. पुढे काय प्रक्रिया होणार आहे?
राज्य सरकारकडे या निर्णयासाठी पाठपुरावा होणार आहे.
5. याचा परिणाम काय होऊ शकतो?
गोकुळच्या निवडणुकीत स्पर्धा आणि राजकीय तणाव वाढू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.