Gokul : धक्कादायक! ‘गोकुळ’चे सुमारे १५० कर्मचारी संचालकांकडे घरगडी? आदेश निघताच खळबळ उडाली

Gokul employee controversy : निवडणुकीच्या तोंडावरच ‘गोकुळ’चे राजकारण चांगलेच तापले असतानाच आता एका आदेशाने कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात (गोकुळ) अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
Gokul Politics
Gokul Politics Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. गोकुळ दूध संघातील काही कर्मचारी संचालकांच्या वैयक्तिक कामासाठी वापरले जात असल्याची चर्चा आहे.

  2. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणामुळे सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

  3. संभाव्य कारवाईपूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांना मूळ कामावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

kolhapur News : नेमणूक कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात (गोकुळ), पण प्रत्यक्ष काम मात्र संचालकांच्या घरात करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना संबंधित संचालकांनी दिल्याचे समजते. त्यामुळे पगार ‘गोकुळ’चा आणि काम मात्र संचालकांच्या घरात करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावरच ‘गोकुळ’चे राजकारण चांगलेच तापले आहे. महायुती म्हणून सर्व पक्ष एकत्रित निवडणूक लढवण्याची भाषा करत असतानाच भाजप नेत्यांकडून महायुतीत सहभागी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरच टीका करण्यास सुरू केली आहे. त्यातून ‘गोकुळ’च्या राजकारणात महायुतीतच संघर्षाची चिन्हे दिसत आहे.

याच पार्श्वभूमिवर संघावर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली सुरू आहेत. प्रशासक नियुक्ती झाल्यास कर्मचाऱ्यांची चौकशीही होणार आहे. त्यात कोणावर कारवाई होणार नाही, याची दक्षता संचालकांच्या पातळीवर घेतली जात आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना संचालकांनी दिल्याने नवा गोंधळ समोर आला आहे.

Gokul Politics
Gokul Politics : ‘गोकुळ’ रणांगण तापलं! ‘भाजपविरोधकांना साथ नाहीच’; आमदार पाटलांचा दादांसमोर आक्रमक इशारा

धक्कादाय म्हणजे ‘गोकुळ’मध्ये नियुक्ती असूनही संघाचे सुमारे १२५ ते १५० कर्मचारी संचालकांच्या घरात अक्षरशः घरगडी म्हणून काम करत असल्याची चर्चा आहे. त्यात काही जण संचालकांच्या खासगी गाडीवर चालक, शेतातील कामे, भाजी आणणे, काही संचालकांच्या मालकीच्या हॉटेलात व्यवस्थापकापासून ते वेटरची कामे करत असल्याची चर्चा आहे.

अशा सर्व कर्मचाऱ्यांना संबंधित संचालकांनी त्यांची नियुक्ती ज्या ठिकाणी आहे, त्याठिकाणी हजर होण्याच्या सूचना केल्या आहेत. यापैकी काही कर्मचारी गेल्या दोन-तीन दिवसांपासून नियुक्तीच्या ठिकाणी हजरही झाले आहेत. प्रशासक नियुक्तीची कारवाई होण्यापूर्वीच संचालकांचे घरगडी म्हणून काम करणारे कर्मचारी पूर्ववत संघात येतील, अशी व्यवस्था सुरू आहे.

दरम्यान ‘गोकुळ’ची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी निवृत्त कर्मचारी तथा स्वीकृत नगरसेवक सुनील वाडकर यांनी केली असून त्यांनी ‘गोकुळ’च्या बदनामीची किनार देऊन चौकशी थांबवू नये अशी मागणी पत्रकाद्वारे केली आहे. यावेळी वाडकर यांनी, गैरव्यवहाराबाबत ‘गोकुळ’च्या चौकशीची केलेली मागणी आणि वाढीव सभासदांबाबत प्रश्‍न विचारणे, हा संघाच्या बदनामीचा भाग होऊ शकत नाही, असेही म्हटले आहे.

याबाबत वाडकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, गेली ६३ वर्षे ‘गोकुळ’ हा महाराष्ट्रात उत्तमरीत्या चाललेला संघ आहे. सद्या ‘गोकुळ’मधील गैरव्यवहार व वाढलेल्या दूध संस्थांबाबत अनेक आरोप -प्रत्यारोप संस्था प्रतिनिधी व राजकीय व्यक्ती यांच्याकडून होत आहेत. याबाबत कर्मचारी संघटनेने ‘गोकुळ’ची बदनामी थांबवा. अन्यथा, शेतकरी व कर्मचारी दोन्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे. पण ‘गोकुळ’ची बदनामी होईल, अशी मागणी होत नाही. शंकांचे निरसन करणे हा खरा सहकार आहे. यामुळे आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, ही आमची भूमिका आहे.

Gokul Politics
Gokul politics : 'माझ्या पाठीशी फडणवीस, ही केवळ सुरुवात', भाजप आमदाराचा मुश्रीफांना इशारा

FAQs :

1. गोकुळ प्रकरणात नेमका आरोप काय आहे?
काही कर्मचारी संचालकांच्या वैयक्तिक कामासाठी वापरले जात असल्याची चर्चा आहे.

2. किती कर्मचारी या प्रकरणात असल्याचे सांगितले जाते?
सुमारे 125 ते 150 कर्मचारी असल्याची चर्चा आहे.

3. कर्मचारी परत का बोलावले जात आहेत?
संभाव्य प्रशासकीय कारवाईपूर्वी त्यांना मूळ कामावर हजर राहण्यास सांगितले आहे.

4. या प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम होईल का?
होय, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा राजकीय परिणाम होऊ शकतो.

5. पुढे काय कारवाई होऊ शकते?
प्रशासक नियुक्ती किंवा चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com