Gokul Sabha Controversy: गोकुळची सभा सुरू होताच खऱ्या सभासदांनी खुर्च्या सोडल्या; नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला

Gokul Milk Dairy: गोकुळ दूध संघाची सभा म्हणजे हाणामारी गोंधळ आणि खुर्च्यांची फेकाफेकी त्याचे चित्र गेल्या 15 वर्षांपासून डोळ्यासमोर आहे. कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे कधीही सभा एक मिनिटात तर कधीही सभा पंधरा मिनिटात गुंडाळली गेली.
Shoumika Mahadik Satej patil Hasan mushrif
Shoumika Mahadik Satej patil Hasan mushrifSarkarnama
Published on
Updated on

Gokul News: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा नेहमीप्रमाणे गोंधळात पार पडली. गोकुळ मधील प्रमुख नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या हातामुळे आणि कार्यकर्त्यांना घातलेल्या खतपाणीमुळे गोकुळच्या सभासदाला केवळ वार्षिक सभेत चिवडा आणि लाडू साठीच निमंत्रण देता की काय? सवाल उपस्थित होत आहे. गोकुळचे सर्वसाधारण सभेला सुरुवात होतानाच अध्यक्षीय भाषणात गोकुळच्या (Gokul) खऱ्या सभासदांनी खुर्च्या सोडायला सुरुवात केली.

तर प्रश्न उत्तर आणि ठराव्याच्या वेळी नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप खेळ रंगतात. मात्र, अशा धुडगूस घालणाऱ्या कार्यकर्त्यांच्या खिशात नेत्यांचे फोन खणखणतात आणि चिठ्ठ्या सापडतात. याचाच प्रत्यय मंगळवारी(ता.09) झालेल्या सभेत दिसून आला. त्यामुळे गोकुळमध्ये खऱ्या सभासदाला वालीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गोकुळ दूध संघाची सभा म्हणजे हाणामारी गोंधळ आणि खुर्च्यांची फेकाफेकी त्याचे चित्र गेल्या 15 वर्षांपासून डोळ्यासमोर आहे. कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे कधीही सभा एक मिनिटात तर कधीही सभा पंधरा मिनिटात गुंडाळली गेली. मात्र, सभासदांच्या नशिबात कधीही सभा पूर्ण वेळ झालीच नाही, हा आजवरचा इतिहास आहे. त्याला यंदाचे वर्ष अपवाद होते. मात्र, तरीदेखील कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ मुश्रीफ यांच्या पॅटर्नला धक्का होता.

गोकुळ दूध संघावर मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ अध्यक्ष होताच यंदाची सभा ही मुलाच्या कारकिर्दीत गाजू नये, त्याची विशेष काळजी मंत्री मुश्रीफ यांनी घेतली होती. त्यासाठी विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांच्याशी देखील चर्चा केली होती. त्यांच्याशी चर्चा नंतर विरोध संपला होता तर कार्यकर्त्यांचा गोंधळ गोकुळच्या सभेत का महत्त्वाचा वाटला? असा सवाल उपस्थित होत आहे.

Shoumika Mahadik Satej patil Hasan mushrif
VP Election Result : एनडीएचा उमेदवार जिंकल्यानंतर काही मिनिटांतच भाजपनं राहुल गांधींना डिवचलं; म्हणाले,' तुमचे तर जनतेसोबत नेतेही...'

महायुती म्हणून विरोधी संचालिका महाडिक यांच्याकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून यंदाच्या सभेत संयम पाळण्यात आला. पण काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ही सभा शांततेत चालण्यासाठी गोकुळच्या प्रशासनाकडून सभासदांना पास दिले होते.

मात्र, सभेवेळी सभासदांपेक्षा नेत्यांचे कार्यकर्तेच पुढच्या रांगेत दिसून आले. ज्यांचा गोकुळ आणि सभासदांचा काडीमात्र संबंध नाही,असे कार्यकर्ते दोन्ही गटाकडून गोंधळ घालताना दिसले. त्यामुळे नेहमीप्रमाणे वैतागलेला खरा सभासद खुर्ची सोडून कधीच निघून गेला होता. याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज गोकुळमधील वरिष्ठ नेत्यांनाच आहे.

Shoumika Mahadik Satej patil Hasan mushrif
Gokul Dudh Sangh Sabha: 'गोकुळ'च्या अध्यक्षपदानंतरच्या पहिल्याच वार्षिक सभेत नवीद मुश्रीफांचा 'हा' रेकॉर्ड; दोन मोठे निर्णय

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक आणि राजकीय नाडी म्हणून या गोकुळ दूध संघाकडे पाहिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वैरी असलेले काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष टोकाचा बनला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com