Gokul Dudh Sangh Sabha: 'गोकुळ'च्या अध्यक्षपदानंतरच्या पहिल्याच वार्षिक सभेत नवीद मुश्रीफांचा 'हा' रेकॉर्ड; दोन मोठे निर्णय

Navid Mushrif big announcement : महायुतीच्या नेत्यांना हाताशी धरून आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या खांद्यावर हात ठेवत इतिहासात पहिल्यांदाच ही सभा दोन तास चालून दाखवली. एरवी ही सभा एका मिनिटात तर दहा मिनिटात संपुष्टात येत होती.
 Navid Mushrif
Navid Mushrif sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ दूध संघाची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल येथील कार्यालयाच्या आवारात गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कर्त्यांनी घातलेला गोंधळ आणि मंजूर नाम मंजूरच्या घोषणेत गोकुळच्या (Gokul) सत्ताधाऱ्यांनी संचालक वाढीचा आणि वासाच्या दुधाला डबल दर देण्याचा ठराव मंजूर केला. इतकेच नव्हे तर गोकुळ दूध संघाचे नव्यानेच झालेले अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी संघाच्या वार्षिक सभेबाबत रेकॉर्ड केले.

महायुतीच्या नेत्यांना हाताशी धरून आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या खांद्यावर हात ठेवत इतिहासात पहिल्यांदाच ही सभा दोन तास चालून दाखवली. एरवी ही सभा एका मिनिटात तर दहा मिनिटात संपुष्टात येत होती. मात्र यंदाची सभा दोन तास चालल्याने अध्यक्षांचं त्यासंदर्भात कौतुक होताना दिसत आहे.

गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ(Navid Mushrif) म्हणाले, गेल्या 2024 -25 या आर्थिक वर्षात संघाने केलेली भरीव प्रगती, शेतकऱ्यांना दिलेले उच्चांकी दूध दर, स्वमालकीचे उभारलेले नवे प्रकल्प, उर्जा बचत, डिजिटल सेवा, सामाजिक बांधिलकी आणि भविष्यातील संकल्प, दिशा अशा अनेक महत्वाच्या बाबीतून गोकुळची वाटचाल सुरु आहे.

तसेच गोकुळच्या भविष्यातील या योजनामुळे संस्थेच्या कामकाजाला नवी गती मिळणार असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर करण्यात आला. संघामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाचा आढावा घेऊन दूध उत्पादक शेतकरी यांच्या हिताचे निर्णय घेण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचे सांगितले.

 Navid Mushrif
VP Election Result : एनडीएचा उमेदवार जिंकल्यानंतर काही मिनिटांतच भाजपनं राहुल गांधींना डिवचलं; म्हणाले,' तुमचे तर जनतेसोबत नेतेही...'

कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्षेत्र आणि संस्थांची संख्या लक्षात घेता संचालक मंडळाची संख्या 21 वरून 25 संचालक करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी या नियमाला मात्र विरोध केला.

ठळक मुद्दे

मार्च 2025 अखेर उलाढाल रु.3,966 कोटी. गतवर्षीच्या तुलनेत रु.296 कोटींची वाढ झाली.

एकूण दूध संकलन : 58.20 कोटी लिटर, म्हैस दूध : 27.08 कोटी लिटर, गाय दूध : 31.12 कोटी लिटर

एक दिवसातील कमाल संकलन : 18.59 लाख लिटर, आगामी उद्दिष्ट : 20 लाख लिटर टप्पा पार करून 25 लाख लिटर संकलन.

 Navid Mushrif
Gokul Sabha: बंटी पाटील नव्हे! गोकुळच्या निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफ विरुद्ध महाडिक अंतर्गत संघर्ष पेटला

गोकुळच्या भविष्यातील योजना -

1. आईस्क्रिम व चीज उत्पादन व विक्री सुरू करणे

2. नवी मुंबई (वाशी शाखा) आणि पुणे शाखेसाठी मदर डेअरीसाठी योग्य जागा खरेदी करणे

3. दही प्रोजेक्ट वाशी नवी मुंबई येथे राबविणे

4. वासरू संगोपन केंद्राद्वारे ५०० वासरे तयार करणे भविष्यातील योजना व सुधारणा

5. सी.एन.जी. पंप व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणी – भविष्यातील वाहनांवरील खर्च कमी करणे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com