Gokul Protest : 'गोकुळ'मध्ये मोठा राडा, आंदोलक-पोलिस भिडले! जनावरे घेऊन कार्यालयात घुसवण्याचा प्रयत्न

Gokul Protest Police Shaumik Mahadik : डिबेंचर रक्कम परत करावी, या मागणीसाठी गोकुळवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.
Clash between police and protesters during Gokul protest; Shaumik Mahadik seen leading aggressively.
Clash between police and protesters during Gokul protest; Shaumik Mahadik seen leading aggressively.sarkarnama
Published on
Updated on

Gokul Protest News : डिबेंचर रक्कम परत करावी, या मागणीसाठी 'गोकुळ'च्या कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये हाणामारी झाली. मोर्चात आणलेली जनावरे आतमध्ये सोडणार नाहीत, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. तर, जनावरे आतमध्ये घेऊन जाण्यासाठी आंदोलक देखील आक्रमक झाले. अखेर संतप्त आंदोलकांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दूध उत्पादकांनी जनावरे आणल्याने पोलिसांनी ही जनावरे हटवण्याच्या सूचना आंदोलकांना केल्या. मात्र, आंदोलन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिसांनी दबावाचा वापर करत जनावरे मोर्चातून बाहेर काढली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांच्या झटापट झाली. आंदोलकांनी गोकुळच्या कार्यालयात घुसण्याचा देखील प्रयत्न केला.

दरम्यान, दिवाळीच्या तोंडावर ही रक्कम कपात केली आहे. संस्था चालकांसोबत त्याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसणार आहे. त्यामुळे या मोर्चात दूध उत्पादकांसह संस्था चालकांचे फलक लक्षवेधी ठरले. नेत्यांची दिवाळी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दिवाळं, आमचे आम्हाला पैसे परत करा, हे पैसे कुणाच्या घशात, असे फलक घेऊन हजारो आंदोलन या मोर्चात उतरले होते.

Clash between police and protesters during Gokul protest; Shaumik Mahadik seen leading aggressively.
Rajya Sabha Election : धक्कादायक : राज्यसभा निवडणुकीसाठी 10 आमदारांच्या बोगस सह्या; पक्षाच्या अध्यक्षाला अटक, भाजपशी कनेक्शन?

डिबेंचरची रक्कम कपात केल्यानंतर संस्थाचालक आणि दूध उत्पादकांमध्ये गोकुळ प्रशासना विरोधात संतापाची लाट आहे. दरवर्षी पंधरा टक्के रक्कम कपात होत असताना यंदा 40% रक्कम कपात केली आहे. त्याचा थेट परिणाम संस्था चालकांच्या तिजोरीवर पडणार आहे. गोकुळ संघामध्ये ज्या संचालकांच्या संस्था आहेत. त्या संस्थेमधून कपातीचा टक्केवारी दर कमी असल्याचा आरोप मोर्चातील काही संस्थाचालकांनी केला आहे.

विरोधी गटात असणाऱ्या संस्थाचालकांची रक्कम ही 40 टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम कपात केली असल्याचे म्हणणे आहे. ज्या संस्थेचे दूध संकलन अधिक आहे. त्या संस्थेची कपात केलेली रक्कम अधिक आहे. रकमेची संख्या ही चार ते पाच लाखांच्या घरात असल्याने अनेक संस्था चालकांनी या निर्णयाविरोधात बंड पुकारले आहे.

Clash between police and protesters during Gokul protest; Shaumik Mahadik seen leading aggressively.
Bihar Election 2025: माझी काय चूक? पक्षश्रेष्ठींनी सांगावं; टिकीट कापल्यावर महिला आमदाराला अश्रु अनावर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com