
Kolhapur News : किती ताकद लावायचे तेवढी लावू दे, पुढच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्यासह नेत्यांना चांगलं यश मिळेल. मोठमोठ्या पक्षातील आमदार आणि खासदारांना फोडलं. आता नगरसेवकांना फोडण्यासाठी राज्याचं नियम बदलले जात आहेत. इतक्यात लहान पातळीवर थोडाफोडी होत असताना गोकुळ इतकी मोठी संस्था आहे. तेथेही राजकारणासाठी फोडाफोडी करतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 'गोकुळ'च्या राजकारणाबाबत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेडचे रोहित पवार हे सोमवारी (ता.19) ते कोल्हापुरात बोलत होते. यावेळी त्यांनी गोकुळमधील सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ते म्हणाले, गोकुळची(Gokul) निवडणूक झाली, तेव्हा कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढली गेली नव्हती. येथील नेत्यांनी जे फॉर्म्युला ठरवला त्या पद्धतीने होणं महत्त्वाचं आहे.
संस्थेच्या माध्यमातून त्या जिल्ह्यावर आपली राजकीय पकड बनवण्यासाठी त्याचा वापर करत आहेत. मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की, जे ठरलंय त्यानुसारच झालं तर संस्थेसाठी चांगले असेल. शब्द देऊन सुद्धा जर राजकारण केलं जात असेल, तर ते योग्य नसल्याचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
नेते काय म्हणतात हे ठरवण्यापेक्षा शेतकरी काय म्हणतात हे पाहून निर्णय घ्या. फोन आला म्हणून निर्णय बदलत असेल, तर लोक त्यांच्यावर शंका घेतील. सत्तेच्या विरोधात जो व्यक्ती लढतो त्या व्यक्तीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ते सध्या सतेज पाटील यांच्याबाबत दिसत असल्याचे सांगत रोहित पवार यांनी पाटील यांची बाजू घेतली.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या संरक्षण समितीवर देखील रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे खासदार त्यामध्ये आहेत. मात्र काँग्रेसचे खासदार घेत असताना काँग्रेसला विचारायला हवं, काँग्रेसचं म्हणणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आता जे कोणी नॉमिनेट झाले असतील, त्यांनी भारताची भूमिका चांगल्या पद्धतीने मांडावी. शशी थरूर यांचं नाव कसं आलं हे माहीत नाही. मात्र, थरूर यांना भारताची भूमिका घेण्यासाठी नियुक्त केलं असेल तर त्यांनी भारताचीच एक समान भूमिका घ्यावी, असेही पवार म्हणाले.
राजकीय दृष्ट्या त्यांनी पुस्तकाचे तेव्हा केलेला असाव. जातिवाद आणि धर्मवाद महाराष्ट्राच्या भूमीत कधीच खपवून घेतला नाही. महाराष्ट्राच्या भूमीतील साधू संतांनी देखील एकात्मतेचे संदेश दिले आहे. मात्र आज मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर आणि जाती जातींमध्ये वाद निर्माण केला जात आहे. साध्या भाषेत बोलायचे गेलं तर या सर्वाला नरक असेच म्हणावे लागेल. असे पवार म्हणाले.
ईडी कायदा आला तेव्हाच अनेक जणांनी हा कायदा राजकीय दृष्ट्या वापरला जाऊ शकतो. असे भाकीत केले होते. या संदर्भात गेल्या काही वर्षात कोर्टाने सुद्धा ताशेरे ओढले आहेत. ईडीने आजपर्यंत जे आरोप केले आहेत त्यातील 99% आरोप हे खरे नव्हते. कोणालातरी अडचणीत आणण्यासाठी हे सर्व केलं गेलं होतं, याबाबत कोर्टाने बोलेले आहे.या कायद्यामध्ये काही बदल होत असतील तर स्वागत आहे. असे सांगत, विरोधी पक्षांनी जनतेसाठी एखादी चुकीची गोष्ट गरज असेल तर रस्त्यावर उतरायला हवं मात्र ते होताना दिसत नसल्याचे परखड मत पवार यांनी व्यक्त केले.
अजितदादांचा वचक कमी पडत आहे. परळीत जो व्हिडिओ आलेला आहे, तो अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या काही महिन्यांत तेथील पोलीस प्रशासनावर बऱ्यापैकी वचक बसलेले आहे. मात्र, तेथील काही पूर्वीचे नेते आणि टोळीला लागलेली सगळे मोडायला वेळ लागत आहे. पालकमंत्री म्हणून अजितदादांनी जो वचक पोलिसांवर आणला आहे, तो कमी पडत आहे.
रायगड आणि नाशिक मधील पालकमंत्री पदाचा विषय सुटेल असा वाटत नाही. यांच्यात वाद होत राहतील एकमेकांविरोधात बोललं जातील. पालकमंत्री नसल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात अडचणी जाणवू लागले आहेत. महायुती मधील नेते आपापसात लढत बसले आहेत. मुख्यमंत्री का निर्णय घेत नाहीत हे कळत नाही.
दोन्ही मित्रपक्षांमध्ये हा वाद चालू असावा, असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल. म्हणून अधिकार असताना सुद्धा ते निर्णय घेत नाहीत. नाशिकमध्ये देखील आता महाकुंभ होणार आहे. तेथे सात-साडेसात हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे पालकमंत्री पद कोणालाही देण्यापेक्षा मुख्यमंत्री स्वतःकडे जबाबदारी घेतले असेल. मात्र, 2029 च्या निवडणुकीपूर्वी हे सर्व विषय संपतील. असा खोचक तोला रोहित पवार यांनी लगावला.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. त्यांना मदत करणे गरजेच आहे. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष आहे. असे दिसत नाही.. सरकारने अद्याप कोणतेही आदेश दिलेले नाहीत. गोकुळ मध्ये राजकारण करण्यापेक्षा राज्यात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाला आहे. तिकडं नेत्यान लक्ष द्यावं.
कृषी मंत्री राज्यात कुठे दिसत नाहीत. टीव्हीवर दिसतात तेव्हा वादग्रस्त स्टेटमेंट करताना दिसतात. त्यामुळे त्यांना कोणीतरी सांगितलं असावं टीव्हीवर येऊ नये त्यामुळे ते आता टीव्हीवर ही दिसत नाहीत. बांधावर ही दिसत नाहीत .टीव्हीवर दिसणं आणि बांधावर दिसने यात फरक आहे.अधिवेशनात आम्ही त्यांना शोधून काढू आणि त्यांनी न काम करून जे पराक्रम केले आहेत ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करू, असेही पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.