Gopichand Padalkar : ओबीसी आरक्षणावरुन गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच बोलले, सरकारला दिला 'हा' मोलाचा सल्ला

Gopichand Padalkar Maratha And OBC Reservation : "आता ओबीसी समाजाने जागरूक होणं गरजेचं आहे. ओबीसी समाजाने एकत्र येऊन एकजूट व्हावं. भुजबळसाहेब नाराज नाहीत."
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Gopichand Padalkar On OBC Reservation : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार चांगलंच कोंडीत सापडलं आहे.

अशातच आता या सर्व पार्श्वमूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी समाजाच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने योग्य भूमिका घ्यावी, असा सल्ला पडळकर यांनी महायुती सरकारला दिला.

ओबीसी आरक्षणासंदर्भात माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, "मराठा समाजाला वेगळं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे. मराठा आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे. सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी समाजाच्या उपोषणकर्त्यांच्या भेटीला गेलं होतं. ओबीसी समाजाच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी सरकारने योग्य भूमिका घ्यावी."

ओबीसी समाजाने एकजूट व्हावं

तसंच अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज नसल्याचंही पडळकरांनी सांगितलं. समता परिषदेबाबत छगन भुजबळ साहेबांशी चर्चा केल्यानंतर बोलेन. मात्र आता ओबीसी समाजाने जागरूक होणं गरजेचं आहे. ओबीसी समाजाने एकत्र येऊन एकजूट व्हावं. भुजबळसाहेब नाराज नाहीत.

Gopichand Padalkar
Video Jayant Patil : "जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, मला टोकाला जायला लावू नका", विशाल पाटील अन् कदमांना इशारा

चुकांमध्ये सुधारणा करू

दरम्यान, यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या पराभवाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "लोकसभेला झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करून, विधानसभेला सामोरे जाऊ. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात चांगलं काम चालू आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com