Gopichand Padalkar : अजित पवारांवरील प्रश्नावर गोपीचंद पडळकरांची सावध भूमिका; ‘प्लीज, तुम्ही महायुतीत वाद लावू नका’

Anjali Damania Criticizes Ajit Pawar : अंजली दमानिया यांनी अजित पवार दहावी पास असल्याचा आरोप केला. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सावध भूमिका घेत, “महायुतीत वाद लावू नका,” अशी विनंती माध्यमांना केली.
Ajit pawar-Gopichand Padalkar
Ajit pawar-Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on
  1. अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार दहावी पास असल्याची टीका केली असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अत्यंत सावध भूमिका घेतली.

  2. पडळकर म्हणाले, “तुम्ही महायुतीमध्ये वाद लावू नका, प्लीज,” असे सांगत त्यांनी वादापासून स्वतःला दूर ठेवले.

  3. जयंत पाटील प्रकरणानंतर भाजप श्रेष्ठींनी दिलेल्या तंबीनंतर पडळकर आता वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

Ahilyanagar, 12 October : ‘आपले अर्थमंत्री (उपमुख्यमंत्री अजित पवार) हे दहावी पास आहेत, त्यांना अर्थकारण कळत नाही,’ असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता, त्यासंदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी अत्यंत सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. ‘प्लीज, तुम्ही महायुतीमध्ये वाद लावायचा प्रयत्न करु नका,’ अशी विनंती त्यांनी हसत हसतच माध्यमांच्या प्रतिनिधींना केली.

अहिल्यानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ आज (ता. 12 ऑक्टोबर) अहिल्यानगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) हे अहिल्यानगरमध्ये आले होते.

जनआक्रोश मोर्चाच्या अगोदर माध्यमांशी बोलताना त्यांना सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात प्रश्न विचारला, त्या वेळी आमदार पडळकर यांनी अत्यंत सावध अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेनंतर सर्वत्र पडळकरांवर निशाणा साधला जात होता.

भाजप श्रेष्ठींनी समज दिल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. पंढरपूर दौऱ्यावर आल्यानंतरही त्यांना जयंत पाटील यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे. त्यांच्यावर मी आता एक शब्दही बोलणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

Ajit pawar-Gopichand Padalkar
Shambhuraj Desai : आमच्यासाठी घरावर दगडे खालेल्या अन्‌ दारात गुलाल ओतलेल्या कार्यकर्त्यांना कधीही विसरणार नाही : शंभूराज देसाई

अंजली दमानिया यांनी ‘उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे दहावी पास आहेत, त्यांना अर्थकारण कळत नाही’ अशी टीका केली होती. त्याबाबत विचारले असता गोपीचंद पडळकर म्हणाले, याबाबत त्यांनाच जाऊन विचारा. तुम्ही महायुतीमध्ये वाद लावायचा प्रयत्न करू नका, प्लीज, अशी विनंतीच आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

मध्यंतरी जयंत पाटील प्रकरणामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना भाजप पक्षश्रेष्ठींकडून तंबी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच आमदार पडळकर यांनी नरमाईचे धोरण घेतल्याचे दिसून येत असून वाद निर्माण होईल, अशी विधाने टाळण्याचा प्रयत्न करताना पडळकर दिसत आहेत.

Ajit pawar-Gopichand Padalkar
Sangola Politics : सांगोल्यात भाजपकडूनच शिंदेंच्या उमेदवाराचा पराभव? शहाजीबापूंच्या विरोधकाला विजयी करण्यासाठी मदत केल्याचं जयकुमार गोरेंचं वक्तव्य

प्रश्न 1 : अंजली दमानिया यांनी कोणावर टीका केली?
त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर “दहावी पास असून अर्थकारण कळत नाही” अशी टीका केली.

प्रश्न 2 : गोपीचंद पडळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी सावध भूमिका घेत म्हटले, “महायुतीमध्ये वाद लावू नका, प्लीज.

प्रश्न 3 : पडळकर यांनी वादग्रस्त विधानांपासून दूर का राहिले?
जयंत पाटील प्रकरणानंतर पक्षश्रेष्ठींकडून तंबी मिळाल्यामुळे त्यांनी संयम दाखवला.

प्रश्न 4 : पडळकर कुठे होते तेव्हा त्यांनी ही भूमिका घेतली?
ते अहिल्यानगरमध्ये जनआक्रोश मोर्चासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com