Shambhuraj Desai : आमच्यासाठी घरावर दगडे खालेल्या अन्‌ दारात गुलाल ओतलेल्या कार्यकर्त्यांना कधीही विसरणार नाही : शंभूराज देसाई

Patan Political News : साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई कॉलेजच्या वादावर भाष्य करत पाटणकर गटाला इशारा दिला. “हिमालयासारख्या लोकनेत्यांना कोणीही धक्का लावू शकत नाही,” असे ते म्हणाले.
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on
  1. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटणकर गटावर टीका करत सांगितले की, काहीजण “आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा प्रयत्न” करत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाला कमीपणा देत आहेत.

  2. त्यांनी स्पष्ट केले की बी. डी. देसाई कॉलेजचे मूळ योगदान लोकनेत्यांचे आहे, आणि त्यांच्या नावाची उंची “हिमालयासारखी” आहे, ती कोणीही कमी करू शकत नाही.

  3. त्यांनी पुढे छत्रपती धर्मवीर संभाजीराजेंच्या नावाने काही उभारले का? असा सवाल उपस्थित करत विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला आणि देसाई कुटुंबाचे लोकांशी असलेले नाते अधोरेखित केले.

Karad, 12 October : लोकनेते बाळासाहेब देसाई कॉलेजची, कोयना शिक्षण संस्थेची स्थापना पत्र्याच्या शेडमध्ये आमच्या लोकांनी केली. आज त्यावर कोण हक्क सांगत आहे? आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. ज्या लोकनेत्यांनी कॉलेज सुरु केले, त्या कॉलेजला सातत्याने बी. डी. देसाई कॉलेज म्हटले जाते. लोकनेत्यांच्या नावाला कमीपणा देण्याचे काम काहीजण करत आहेत. मात्र, हिमालयाची उंची असलेले लोकनेते बाळासाहेब देसाई यांना कोणीही धक्का लावू शकत नाही, असा इशारा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे कट्टर विरोधक पाटणकर गटाला दिला.

पाटण (Patan) तालुक्यातील दौलतनगर येथील युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई कॉलेजवर एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत लोकनेते बाळासाहेब देसाई कॉलेज असा उल्लेख न करता बी. डी. कॉलेज असे म्हटले गेले. त्याचा शंभूराज देसाई यांनी आपल्या शब्दांत समाचार घेतला.

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. ज्या लोकने त्यांनी कॉलेज सुरु केले, त्या कॉलेजला सातत्याने बी. डी. देसाई कॉलेज म्हटलं जातं. लोकनेत्यांच्या नावाला कमीपणा देण्याचे काम काहीजण करत आहेत. मात्र, हिमालयाची उंची असलेले लोकनेते बाळासाहेब देसाई यांना कोणीही धक्का लावू शकत नाही.

जाणीवपूर्वक नावाला कमीपणा देत आहात. वारंवार या गोष्टी होत आहेत. याचे काय करायचे ते मलाही आणि लोकांनाही चांगले माहिती आहे. मी कोणाला इशारा देत नाही. योग्य वेळी माणसं बटन दाबून हे सगळं दाखवून करेक्ट कार्यक्रम करतात. त्यांनी छत्रपतींचे वारसदार, सेवक, श्रीमंत सरदार सांगायचे आणि करायचे काय? छत्रपती, धर्मवीर यांच्या नावाचे आजपर्यंत यांनी का नाही काही उभारले? का कोणत्या संस्थेला छत्रपती धर्मवीर संभाजीराजेंचे नाव दिले? असा सवालही शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला.

Shambhuraj Desai
Solapur BJP : रोहिणी तडवळकरांनी केली आमदार देशमुखांची भाजपश्रेष्ठींकडे तक्रार; ‘शहर उत्तर’मध्ये पर्यायी यंत्रणा उभारण्याची परवानगी द्या’

मंत्री देसाई म्हणाले, यशराज देसाई यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मंत्र्यांचा, आमदाराचा मुलगा म्हणून वाढदिवस झाला, असं कोणीतरी म्हणेल. वारसा घराण्यातून मिळतो; परंतु तो पुढे कसा जोपासता, हे महत्त्वाचे आहे. छोटेसे पद मिळाले तरी मुलांच्या वागण्यात बदल होतो, परंतु माझ्या मुलाचे मी कौतुक करत नाही तर जे बघतो ते सांगतो.

वेळेच्या बाबत यशराज परफेक्ट आहेत. आमच्या घराण्याचे नाते राजकारणाशी नाही तर लोकांसोबत आहे. लोकांचा लोंढा देसाई परिवाराकडे लागला आहे; कारण देसाई गटच आपले प्रश्न सोडवू शकतो, अशी पाटण तालुक्यातील लोकांची मानसिकता झाली आहे.

नवीन आले म्हणून जुने आम्ही विसरणार नाही. आमच्यासाठी घरावर दगडे, दारात गुलाल ओतलेल्या कार्यकर्त्यांना आम्ही विसरणार नाही. आमच्या कुटुंबासाठी लोकांनी खस्ता खाल्या आहे. देसाई कुटुंबाची नाळ लोकांशी जोडलेली आहे. आजचा काळ संघर्षांचा आहे. पिढ्यानपिढ्याचे नाते आपल्याला टिकवायचे आहे. आधार देणारी शिदोरी लोकनेत्यांनी दिली आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Shambhuraj Desai
Dr. Babasaheb Deshmukh : ‘दादांनो, मी भोळा दिसत असेल...पण तसा नाय, एक-दोघांना माझा दणका माहिती हाय’; संयमी बाबासाहेब देशमुखांचा आक्रमक अंदाज

प्रश्न 1 : शंभूराज देसाई यांनी कोणावर टीका केली?
त्यांनी पाटणकर गटावर लोकनेत्यांच्या नावाला कमीपणा देण्याचा आरोप केला.

प्रश्न 2 : वाद कशावरून निर्माण झाला?
बी. डी. देसाई कॉलेजच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत लोकनेत्यांचे पूर्ण नाव न वापरल्यामुळे वाद निर्माण झाला.

प्रश्न 3 : देसाई यांनी काय इशारा दिला?
“योग्य वेळी लोक बटन दाबून करेक्ट कार्यक्रम करतात,” असे म्हणत त्यांनी राजकीय इशारा दिला.

प्रश्न 4 : देसाई कुटुंबाबाबत त्यांनी काय सांगितले?
आमचे नाते राजकारणाशी नव्हे तर लोकांशी आहे; लोकांचा विश्वास देसाई परिवारावरच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com